Dhule News: साक्री तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासंदर्भात आज पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी साक्री (Sakri) तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. (Letest Marathi News)
साक्री तालुक्यात सोमवारी झालेल्या गारपिटीमुळे कांदा, सोयाबीन, गहू त्याचबरोबर पपई, आंबा या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर पोहचून मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली आहे. त्याचबरोबर तात्काळ नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश मंत्री गिरीश महाजन यांनी कृषी विभागाला दिले.
भरपाई देण्याचे आश्वासन
लवकरात लवकर नुकसान भरपाई (Dhule News) मिळवून देणार असल्याचे देखील आश्वासन यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार मंजुळा गावित, खासदार सुभाष भामरे व आमदार जयकुमार रावल तसेच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी देखील या शेती नुकसान पाहणी दौऱ्यामध्ये सहभागी असल्याचे बघायला मिळाले आहे.