Dhule : अवैध गर्भपात केंद्रावर छापेमारी; रुग्णालयाची मान्यता रद्दच्या हालचाली, डॉक्टरसह नर्सवर गुन्हा दाखल

Dhule News : धुळे शहरातील साक्री रोड परिसरामध्ये काल जिल्हा प्रशासनातर्फे सुमन हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आलेल्या छापीमारीनंतर या हॉस्पिटलमध्ये अवैधपणे गर्भपात सुरू असल्याची बाब उघडकीस आली होती
Dhule News
Dhule NewsSaam tv
Published On

धुळे : गर्भलिंग निदान चाचणी व गर्भपात करणे कायदेशीर गुन्हा असताना देखील सर्रासपणे अनधिकृतपणे सोनोग्राफी केंद्रावर गर्भलिंग निदान करून गर्भपात केला जात असतो. त्यानुसार अनधिकृत गर्भपात करण्यात येत असलेल्या धुळ्यातील सोनोग्राफी केंद्रावर छापेमारी करत कारवाई करण्यात आली. या प्रकरणी डॉक्टरसह दोन नर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रुग्णालयाची मान्यता देखील रद्द करण्याच्या हालचाली सुरु आहेत.

धुळे शहरातील साक्री रोड परिसरामध्ये काल जिल्हा प्रशासनातर्फे सुमन हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आलेल्या छापीमारीनंतर या हॉस्पिटलमध्ये अवैधपणे गर्भपात सुरू असल्याची बाब उघडकीस आली होती. सुमन हॉस्पिटल या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या माहितीच्या आधारे या ठिकाणी अवैधपणे गर्भपात केले जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा प्रशासनातर्फे या रुग्णालयात सोमवारी छापेमारी करण्यात आली होती.

Dhule News
Ulhasnagar Crime : एक लाखाचे ५ लाख रुपये करून देण्याच्या नावाने फसवणूक; पोलिसांकडून पाचजण ताब्यात

डॉक्टरसह दोन नर्सवर गुन्हा दाखल 

गर्भपात होत असल्याच्या तक्रारीवरून सदरची कारवाई करण्यात आली होती. याठिकाणी प्रत्यक्ष गर्भपात करण्यासाठीची तयारी सुरु असल्याचे आढळून आले होते. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणात आता धुळे शहर पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात रुग्णालयातील डॉक्टर आणि दोघा नर्सचा समावेश आहे. 

Dhule News
Nanded : गावात देशी दारूचे दुकान; ग्रामपंचायत हद्दीतून हटवण्यासाठी गावकऱ्यांचा रास्ता रोको

मान्यता रद्द करण्याच्या हालचाली 

आता या कारवाईत तिघा जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता रुग्णालयाची देखील मान्यता रद्द केली जाणार आहे. रुग्णालयाची देखील मान्यता रद्द करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे धुळे शहरात किमान अवैध गर्भपाताच्या प्रकाराला आळा बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com