संजय सूर्यवंशी
नांदेड : गावात देशी दारूचे दुकान असून याठिकाणी दारूची अवैध विक्री केली जात असते. यामुळे अनेकांना दारूचे व्यसन लागले असून सदरचे दुकान ग्रामपंचायत हद्दीतून हटविण्याची मागणी मागील वर्षभरापासून ग्रामस्थांनी लावून धरली आहे. मात्र दारूचे दुकान अद्याप हटविण्यात आलेले नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज थेट रास्ता रोको आंदोलन करत दुकान हटविण्याची मागणी केली आहे.
नांदेडच्या बळीरामपूर येथील गावकऱ्यांनी हे रास्ता रोको आंदोलन केले आहे. गावात सुरु झालेल्या या देशी दारूच्या दुकानामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. इतकेच नाही तर दारू पिऊन अनेक जण गुन्हेगारीकडे वळत असून अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे गावातील देशी दारूचे दुकान बळीरामपूर या गावातून इतर ठिकाणी हलवण्यात यावे अशी गावाकऱ्यांची मागणी आहे.
ग्रामस्थांची वर्षभरापासून मागणी
मागील एका बर्षांपासून गावातील देशी दारूचे दुकान हटवण्याची मागणी गावकरी करीत आहेत. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलीस प्रशासन गावाकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या मागणीसाठी गावातील महिला देखील आक्रमक होत रस्त्यावर उतरल्या असून आंदोलन पुकारण्यात आले आहे.
नांदेड शहरालगत रास्ता रोको
दरम्यान गावातील देशी दारूचे दुकान गावातून हटविण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. यातच आज नांदेड शहरा लगत असलेल्या चंदासिघ कॉर्नर येथे गावाकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या रास्ता रोको आंदोलनात गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रास्ता रोको आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.