Dhule Corporation
Dhule CorporationSaam tv

Dhule Corporation : जीर्ण व धोकादायक १५६ घरांना धुळे महापालिकेकडून नोटीस

Dhule News : पावसाळा सुरू झालेला असताना अशा परिस्थितीमध्ये जीर्ण व धोकादायक इमारतींचा प्रश्न उपस्थित होत असतो.
Published on

धुळे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सर्व्हे करण्यात येत असतो. त्यानुसार धोकेदायक व जीर्ण असलेल्या इमारती खाली करण्याच्या सूचना दिल्या जातात. अशा धुळे शहरातील १५६ इमारत मालकांना धुळे महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. 

Dhule Corporation
Jalna Crime : शेतीच्या वादातून शेतकऱ्याची हत्या, एकजण गंभीर जखमी; सातजण पोलिसांच्या ताब्यात

पावसाळा सुरू झालेला असताना अशा परिस्थितीमध्ये जीर्ण व धोकादायक इमारतींचा प्रश्न उपस्थित होत असतो. (Dhule) यावर्षी देखील पालिका प्रशासनातर्फे अशा जीर्ण व धोकादायक इमारतींचा सर्वे करण्यात आला असून जीर्ण झालेले व धोकादायक असलेल्या १५६ घरे व इमारतींना पालिका प्रशासनातर्फे नोटीस देखील बजावण्यात आली आहे. ही सर्व १५६ घरे व इमारती पावसाळ्यामध्ये वास्तव्यात राहण्यासाठी योग्य नसल्याने या ठिकाणी तेथील रहिवाशांनी अशा धोकादायक घरांमध्ये राहू नये; अशा सूचना (Dhule Corporation) पालिका प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. 

Dhule Corporation
Shirdi Sai Baba : साई चरणी ४२ लाख ८० हजार रुपयांचा सुवर्ण मुकुट अर्पण

महापालिकेकडून दरवर्षी हि प्रक्रिया राबविली जाते. मात्र नागरिक या नोटिसींना प्रतिसाद न देता तेथेच राहत असतात. यंदा देखील हि प्रक्रिया राबविली गेली असून जोरदार पावसाच्या सरी कोसळल्यानंतर या जीर्ण व धोकादायक इमारतींची पडझण होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्यामुळे, येथील रहिवाशांना या घरांमध्ये न राहण्याच्या सूचना पालिका प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com