Jalna Crime : शेतीच्या वादातून शेतकऱ्याची हत्या, एकजण गंभीर जखमी; सातजण पोलिसांच्या ताब्यात

Jalna News : नेर येथे शेत जमिनीच्या वादातून भावकीच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारीत काठ्या, कुऱ्हाडी, कोयत्याचा वापर
Jalna Crime
Jalna CrimeSaam tv

अक्षय शिंदे

जालना : भाऊबनकीत शेतीचा जुना वाद उफाळून आल्याने वाद मारहाणीपर्यंत आला. यातूनच शेतकऱ्यावर कोयत्याने वर करत शेतकऱ्याची हत्या करण्यात आली. तर याच घटनेत अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे.

Jalna Crime
Dhule News : अवैधपणे गॅस सिलेंडरची साठवणूक; धुळे पोलिसांनी छापा टाकत कारवाई, १६ सिलेंडर केले जप्त

जालना (Jalna) जिल्ह्यातील नेर येथे हि घटना घडली असून या घटनेत संतोष किसान उफाड (वय ३८) असे मृत झालेल्या शेतकऱ्याचे (Farmer) नाव आहे. नेर येथे शेत जमिनीच्या वादातून भावकीच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारीत काठ्या, कुऱ्हाडी, कोयत्याचा वापर करून संतोष किसनराव उफाड (वय ३८) या तरुणांसह गंभीर जखमी करण्यात आले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात रात्री उपचार सुरू असताना संतोष उफाड याचा मृत्यू झाला. तर मयत संतोष उफाड यांचा मुलगा सोमेश उफाड आणि पुतण्या शशांक उफाड या दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Crime News) याप्रकरणी मौजपुरी पोलिसांकडून अरुण उफाड, श्याम उफाड, अमोल उफाड, आदित्य उफाड, केशव उफाड यांच्यासह दोन महिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalna Crime
Saam Impact : संभाजीनगर- जळगाव रोडवरील पूर्णा नदीच्या पुलाची दुरुस्ती; दोन्ही बाजूंनी पडले होते मोठे खड्डे

चार दिवसाची पोलीस कोठडी
दरम्यान या खून प्रकरणात पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे हे करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com