Accident : टायर फुटल्याने पोलीस कारचा भीषण अपघात; पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

Dhule Accident : धुळे जिल्ह्यातील शिरपूर-दहिवड फाट्यावर भीषण अपघात झाला. टायर फुटल्याने पोलीस कार उलटली. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.
Accident
Accidentx
Published On
Summary
  • धुळे जिल्ह्यात शिरपूर-दहिवद फाट्यावर पोलीस कारचा भीषण अपघात झाला.

  • टायर फुटल्याने कार उलटली; एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

  • दोन पोलीस गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भूषण अहिरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Accident News : धुळे जिल्ह्यातून एक मोठी बातमी आली आहे. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात महामार्ग पोलीस वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका महामार्ग पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वाहनातील इतर कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर-दहिवद फाटा हा धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेला एक महत्त्वाचा चौक आहे. या शिरपूर दहिवद फाट्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. महामार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनाचे मागचे टायर फुटले आणि भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये वाहनातील एक पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

Accident
Crime : नको तिथे हात लावला, चाकूचा धाक दाखवून तरुणीचे शोषण; मारहाण करुन पैसेही चोरले

नवल वसावे असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पेट्रोलिंग करत असलेल्या वाहनामध्ये बसले होते. या वाहनातील आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना शिरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Accident
Crime : पाठलाग केला, पेट्रोल ओतलं अन् पेटवून दिलं; संशयानं डोकं फिरलं, लिव्ह-इन पार्टनरला जिवंत जाळलं

धुळे जिल्ह्यातील शिरपूर-दहिवद फाट्यावर महामार्ग पोलीस वाहनाचा अपघात झाला. नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करत असताना या पोलीस वाहनाचे मागील टायर फुटले आणि पोलीस वाहन अपघातग्रस्त झाले. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून आणखी दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर शिरपूरमधून खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Accident
Bhiwandi : धक्कादायक! शिर धडावेगळं केलं अन् खाडीत फेकलं, भिवंडीत आढळलं महिलेचं शिर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com