Dhananjay Munde
Dhananjay MundeSaam TV

पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच; धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीचेच घटक असलेल्या शिवसेनेच्या आमदारांवरही अप्रत्यक्ष टिका केली.
Published on

सातारा : येणाऱ्या काळाता राज्यात मुख्यमंत्री (CM) हा आपलाच असेल असं वक्तव्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी साताऱ्यातील डिस्कळ येथील एका सभेत व्यक्त केलं आहे. धनंजय मुंडे आज राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या मतदार संघात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी खटाव तालूक्यातील डिस्कळ येथे आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

तसंच यावेळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी महाविकास आघाडीचेच घटक असलेल्या शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांवरही अप्रत्यक्ष टिका केली. तर पुढच्या वेळी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रीपदाचे खाते हे माझ्याकडेच असेल कारण पुढचा मुख्यमंत्री हा आपलाच असेल असं भाकित केलं आहे.

Dhananjay Munde
मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता

ते म्हणाले, 'कितीही मजबूत सरकार असलं तरी विरोधी पक्षनेता असताना त्या सरकारला गदागदा हालवण्याचं काम मी केलं. आज शब्द देतो येणाऱ्या काळात जर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रीपद कोणाला द्यायचा उद्या जर प्रस्ताव आला मुख्यमंत्री कोणीही असतील, आपलेच असतील, मात्र, ते पद आपल्याशिवाय कोणाला देणार नाहीत येवढी प्रतिष्ठा या मंत्रीपदाच्या कामांमुळे कमावली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

मंत्री धनंजय मुंडेंच्या या वक्तव्याच्या आता राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरु असून राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाचे वेध लागलं आहे की काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे, अख्खा पक्ष घेऊन तुझ्या दर्शनाला येईल असं तुळजाभवानी मातेला साकडं घातलं होतं. त्यामुळे आता राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाचं वेध लागलं आहे की काय अशा चर्चा सुरु आहेत.

Dhananjay Munde
...म्हणून अजित पवारांनी सोनिया गांधी, राज ठाकरेंना कोरोना झाल्याचं उदाहरण दिलं

दरम्यान, आता विरोधकांकडून मुंडेंच्या या वक्तव्यावर टीका करण्यात येत आहे. मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी ट्विटद्वारे मुंडेंच्या वक्तव्याचा आधार घेत शिवसेना आणि राऊतांवर टीका केली आहे. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल असं धनंजय मुंडे म्हणतायत, तर मग संजय राऊत व त्यांच्या सेनेने काय धूनी भांडी करायची का मग तुमची ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सेनेवर निशाणा साधला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com