Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी साकडं, वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी केली 'लाडूतुला'

Dhananjay Munde birthday : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात ५१ किलो मोतीचूर लाडूची लाडूतुला करण्यात आली. कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुन्हा कॅबिनेट मंत्रिपदासाठी सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना केली.
Dhananjay Munde birthday
Dhananjay Munde birthdaysaam TV
Published On

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या ५१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत सोलापुरात त्यांच्या एका कट्टर कार्यकर्त्याने अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहे. सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते सन्नी देवकाते यांनी मुंडे यांच्या प्रतिमेची तब्बल ५१ किलो मोतीचूर लाडूने ‘लाडूतुला’ केली.

या अनोख्या लाडूतुलेनंतर देवकाते यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात दंडवत घालत सिद्धरामेश्वराची मनोभावे महाआरती केली. यावेळी त्यांनी मुंडे यांना लवकरात लवकर कॅबिनेट मंत्रीपद मिळावे, असे साकडे देवाच्या चरणी घातले. एवढेच नव्हे तर, “जोपर्यंत साहेबांना मंत्रीपद मिळत नाही, तोपर्यंत मी डोक्याला फेटा बांधणार नाही,” असा संकल्प त्यांनी जाहीर केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते सन्नी देवकाते यांनी सोलापूरच्या ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. धनंजय मुंडे साहेबांचा ५१ वा वाढदिवस असल्याने, सन्नी देवकाते यांनी एक कार्यकर्ता म्हणून ५१ किलोचा मोठा लाडू सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी समर्पित केला असे ते म्हणाले.

मंदिरात पहिल्यांदा महाआरती करण्यात आली. त्यानंतर या ५१ किलोच्या लाडूची तुला (नियोजन) करून हा सर्व लाडूचा प्रसाद मंदिरातील अन्नछत्रामध्ये सर्व भाविकांना वाटण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. "धनंजय मुंडे साहेबांना लवकर कॅबिनेट मंत्रीपद मिळावे," अशी इच्छा देवकाते यांनी सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी व्यक्त केली असून त्यासाठी साकडं घातलं आहे.

धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद?

सन्नी देवकाते यांनी एक मोठा वैयक्तिक संकल्प (प्रण) बोलून दाखवला आहे. जोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळत नाही, तोपर्यंत मी डोक्याला फेटा बांधणार नाही, असे देवकाते म्हणाले. त्यांच्या वक्तव्याची सोलापूरच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रातील धनंजय मुंडे यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असे वाटते की 'धनुभाऊ' यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली पाहिजे. हीच भावना सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांनी ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी मांडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com