Devgad Hapus : अस्सल हापूसवर असणार युनिक कोड; बोगस विक्रीला आळा बसणार, खरा हापूस कसा ओळखणार?

Devgad Hapus News : अस्सल हापूसवर युनिक कोड असणार आहे. यामुळे बोगस विक्रीला आळा बसणार आहे. खरा देवगड हापूस कसा ओळखणार, याबद्दल जाणून घेऊयात.
Devgad Hapus
Devgad Hapus News Saam tv
Published On

विनायक वंजारे,साम टीव्ही

सिंधुदुर्ग : देवगड हापूस आंब्याच्या नावाने बोगस विक्रीला पायबंद घालण्यासाठी शेतकऱ्यांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने आता प्रत्येक देवगड हापूस आंब्याला युनिक कोडचा (UID) देण्याचा निर्णय देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने घेतला आहे. त्यामुळे आता देवगड हापूसच्या प्रत्येक आंब्यावर युनिक कोड असणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

युनिक कोडचे पेटंट मिळालेल्या मुंबईतल्या सन सोल्यूशन या कंपनीबरोबर संस्थेने करार केलाय. युनिक कोड संस्थेमार्फत वितरित केले जाणार असून युनिक कोडचा बोगस वापर होऊ नये, त्याकरिता शेतकऱ्यांना देवगड तालुक्यातील आंबा कलमे त्यांच्या 7/12 उताऱ्यावर तपासावा. तसेच त्यांची उत्पादन क्षमता बघून तितकेच कोड मिळणार आहेत, असे कोड मिळण्याकरता प्रत्येक शेतकरी जीआय धारक असायला हवा.

Devgad Hapus
Nashik Farmer : बायकोचे दागिने गहाण ठेवून कांदा पिकवला, पण भावच मिळाला नाही; रडत रडत शेतकऱ्याने घेतली मोठी शपथ

शेतकऱ्यांनी संस्थेकडे संपर्क साधून नोंदणी करावी आणि कोडची ऑर्डर नोंदवावी, असे आवाहन देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष अजित गोगटे यांनी केले आहे. ग्राहकांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून साध्या सोप्या पद्धतीने आंब्याची तपासणी करता येणार आहे. यासाठी +919167668899 हा नंबर ग्राहकांना देण्यात आला आहे.

Devgad Hapus
Hapus Mango : देवगडचा की दक्षिण भारतातला? खरा हापूस आंबा कसा ओळखाल?

देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष अजित गोगटे म्हणाले, ' परवाच्या दिवाशी एका मेळावा झाला होता. देवगड हापूसला स्वतंत्र्य कोड मिळावा, यासाठी १५ वर्षांपूर्वी अर्ज केला होता. पण मिळू शकला नाही. अनेक ठिकाणांहून अर्ज आले होते. आम्हाला तेव्हा साथ मिळाली नाही. देवगडची स्वतंत्र्य ओळख निर्माण करायची होती. पण ते शक्य झालं नाही. मग आता काय करायचं? देवगडच्या नावावर फसवणूक होते. कर्नाटकी, गुजरातचे आंबे विकले जातात.

Devgad Hapus
Hapus Mango: खवय्यांसाठी खुशखबर...देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी रवाना, इतकी आहे किंमत?

'बाजारात देवगडचा आंबाच्या नावाखाली दुसरे आंबे विकले जातात. देवगडच्या नावाला जीआय टॅग मिळाला. पण देवगडचा हापूस असा मिळाला नव्हता. त्यामुळे आम्ही युनिक कोड काढला. युनिक कोडच्या मागेही कोड नंबर लिहिला आहे. तो कोड नंबर व्हॉट्सअॅपला टाकला की, त्याची माहिती मिळेल. देवगडच्या हापूस आंब्याला संरक्षण मिळवायचं असेल तर बागायदारांनी उठाव केला पाहिजे', असे गोगटे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com