Devgad Hapus Mango
Devgad Hapus MangoSaam Tv

Devgad Hapus Mango: देवगड हापूस आंबा घेताय; मग ही बातमी वाचाचं

पुणे येथील मार्केट यार्डमध्ये केरळ आंब्याची देवगड हापूस या नावाने विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
Published on

पुणे: पुणे येथील मार्केट यार्डमध्ये केरळ आंब्याची देवगड हापूस (Devgad Hapus Mango) या नावाने विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने कारवाई केली आहे. फळ बाजारातील तीन अडत्यांवर कारवाई करुन त्यांच्याकडून दंड वसुल केला आहे. बाजार समितीने १ डझनचे ४२ बॉक्स बाजार समितीने जप्त केले आहेत.

सध्या आंब्याचा (Mango) हंगाम सुरु झाला आहे. पुण्यात कोकणचा राजा हापूस आंब्याची देवगड, रत्नागिरी येथून आवक होते. पण सध्या कर्नाटक आणि केरळमधूनही हापूस आंब्यासारखा दिसणाऱ्या आंब्याची आवक होते. व्यापारी हा आंबा हापूस आंबा म्हणून ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.

Devgad Hapus Mango
Devendra Fadnavis Updates | देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना !;पाहा व्हिडीओ

कर्नाटक (Karnataka) आणि केरळ (Keral) येथून येणाऱ्या आंब्याची चव आणि सालीमध्ये फरक आहे. कोकणातील हापूस आंबा रसाळ आणि चवीस चांगला असतो. त्यामुळे  कोकणातील आंब्यांना (Mango) सर्वाधिक मागणी असते. म्हणूनच या आंब्याच्या किंमतीही जास्त असतात. याचा फायदा घेत व्यापारी, विक्रेते नागरिकांची फसवणूक करत असल्याचे समोर आलं आहे. आंब्यांची अदलाबदल करून विक्री होत आहे, हंगामाच्या सुरवातीलाच असा प्रकार उघडकीस आला आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com