Viral Video
Hapus MangoSaam Tv

Hapus Mango: खवय्यांसाठी खुशखबर...देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी रवाना, इतकी आहे किंमत?

Viral Video: आंब्याचा हंगाम सुरू होण्यासाठी अजूनही तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे परंतु असे असले तरी या वर्षाच्या हंगामातील पहिली आंब्याची पेटी नाशिकला रवाना झाली आहे.
Published on

Viral Video: देशभरात सर्वत्र दिवाळीचा साजरी केली जात आहे मात्र दुसरीकडे आंबा हे फळ आवडणाऱ्या खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सध्या यंदाच्या हंगामातील जगप्रसिद्ध देवगड हापूस आंब्याची पेटी नाशिकमध्ये दाखल झाली आहे. सध्या आंबा या फळाचा मौसम सुरु होण्यासाठी अजून तीन- चार महिने राहिले आहे मात्र त्याआधीच मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांनी यंदाच्या हंगामातील पहिलीच देवगड हापूसची पेटी नाशिकला थेट ग्राहकापर्यंत पोहचवली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

दिवाळी (Diwali) पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर उत्तम फोंडेकर यांनी चार डझनाची पेटी थेट ग्राहकाला विक्री केली आहे. या पेटीला फोंडेकर यांना २५ हजाराचा विक्रमी भाव मिळाला आहे. फोंडेकर यांनी तिसऱ्यांदा पहीली आंबा पेटी विक्री करण्याचा मान मिळवला आहे. आंब्याचा हंगाम सुरू होण्यासाठी अजूनही तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे परंतु असे असले तरी या वर्षाच्या हंगामातील पहिली पेटी मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार फोंडेकर यांच्या बागेतून नाशिकला (Nashik) पाठविण्यात आली आहे.

व्हायरल होत असलेल्या आंब्याचा व्हिडिओ युट्युब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ ''@saamtv'' या अकाउंटवर पोस्ट केलेला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वांना आता मे महिना कधी सुरु होतोय असे झालेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Video
Viral Video: घरची लक्ष्मी! आजच्या दिवसातील सर्वात सुंदर VIDEO; एकदा पाहाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com