Devendra Fadnavis News: ...तर आम्ही पाकिस्तानात जाऊन हनुमान चालीसा म्हणू; देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले?

Devendra Fadnavis in Amravati: 'तो दिवस दूर नाही, त्या दिवशी आम्ही पाकिस्तानात जाऊन हनुमान चालीसा म्हणू, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.
Devendra Fadnavis on Hanuman chalisa
Devendra Fadnavis on Hanuman chalisa saam tv

अमर घटारे

Devendra Fadnavis News In Marathi

अमरावतीत राणा दाम्पत्याच्या वतीने दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. 'तो दिवस दूर नाही, त्या दिवशी आम्ही पाकिस्तानात जाऊन हनुमान चालीसा म्हणू, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. (Latest Marathi News)

अमरावतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोविंदा पथकाशी संवाद साधताना म्हणाले, 'आपण इंडिया माता की जय म्हणतो का, नाही ना... आपण भारत माता की जय म्हणतो. आपल्या देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी करत आहेत. त्या सर्वसामान्यांच्या आशाआकांक्षा पूर्ण करतील. तुमचे आशीर्वाद पाठीशी असून द्या'.

Devendra Fadnavis on Hanuman chalisa
Uddhav Thackeray News: 'गद्दारांना त्यांच्याच खोक्यात गाडून टाकू...' जळगावच्या सभेतून उद्धव ठाकरे कडाडले; शिंदे- फडणवीसांवरही हल्लाबोल

'आज दहीहंडीच्या निमित्ताने ही हंडी फोडायची आहे. त्यातला काला प्रत्येकापर्यंत पोहोचावयचा आहे. हा श्रीकृष्णाचा काला आहे. श्रीकृष्णाचं आपल्याशी नातं आहे. श्रीकृष्ण अमरावती जिल्ह्याचे जावई आहेत. या नात्यामुळे आपल्याला काला प्रत्येकापर्यंत पोहोचावयचा आहे, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना फडणवीस म्हणाले, '१२ दिवस हनुमान चालीसा म्हटलं म्हणून राणा दाम्पत्यांना तुरुंगात राहावं लागलं. माझा सवाल आहे, हनुमान चालीसा या देशात म्हणायची नाही, तर मग पाकिस्तान जाऊन म्हणायची का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

'आता तो दिवस दूर नाही, ज्या दिवशी आम्ही पाकिस्तान जाऊन हनुमान चालीसा म्हणू. देशात नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे. आम्ही पाकिस्तानातही हनुमान चालीसा बोलू शकतो. पण भारतात हनुमान चालीसा बोलण्याला बंदी घातली होती. या लोकांना घरी बसवायचं आहे. त्यांना सांगा आम्ही सहन करू शकत नाही, असे फडणवीस पुढे म्हणाले.

Devendra Fadnavis on Hanuman chalisa
Parbhani Crime News: परभणीत सरकारी अधिकाऱ्याची आत्महत्या; घटनेमागचं कारण काय?

'काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या बाजूला बसले होते. त्याच स्टॅलिन यांच्या सुपुत्राने हिंदू धर्म डेंग्यू, मलेरिया सारखा आहे, त्याला नष्ट करा असं म्हणाला. त्यांची अशी बोलायची हिंमत कशी झाली? या देशावर आक्रमण करणारे संपले, पण हिंदू धर्म संपला नाही. कोणीही हिंदू धर्माला संपवू शकत नाही, असेही ते पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com