देवेंद्र फडणवीसांना केंद्रात नवी जबाबदारी? दिल्लीत भाजपच्या गोटात हालचाली

Devendra Fadnavis New Central Role Delhi Political Speculation: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याच्या तयारीला लागलेत का? असा प्रश्न विरोधकांना पडलाय. कारण फडणवीसांवर दिल्लीत मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. काय आहे ही जबाबदारी? कोणत्या पदावर फडणवीसांची वर्णी लागणार आहे?
Is Devendra Fadnavis likely to join BJP national leadership
Is Devendra Fadnavis likely to join BJP national leadershipsaam tv
Published On

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे दिल्ली दौरे वाढू लागलेत तसं राज्याच्या राजकारणात त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.त्यातच मुख्यमंत्री फडणवीसांनी महायुतीतील नेत्यांसोबत वर्षा निवासस्थानावर खलबतं केल्याची माहिती समोर येतेय. या बैठकीनंतर विरोधकांना मात्र गुदगुल्या झाल्यात. फडणवीस पंतप्रधान व्हावे अशी इच्छा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी बोलून दाखवलीये. तर दुसरीकडे फडणवीसांनी दिल्लीला जायची आवराआवर सुरू केली असल्याचं थेट विधान संजय राऊतांनी केलं आहे....

ज्या बैठकीवरून ही चर्चा सुरू झालीय त्याची इनसाईड स्टोरीही साम टिव्हीच्या हाती लागलीय. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महायुतीतील प्रमुख नेत्यांना ताकीद दिल्याच सांगितलं जातंय. या बैठकीत नेमकं काय घडलंय तेही पाहूयात..

फडणवीसांची नेत्यांना वॉर्निंग

स्थानिक स्तरावर महायुतीत पूर्णपणे समन्वय ठेवावा

महायुतीतील आमदार किंवा खासदारानं एकमेकांच्या नेत्यांवर किंवा पक्षांवर सार्वजनिक टीका करू नये

निधी वाटपावरून मतभेद झाल्यास सर्वप्रथम विभागीय आयुक्तांमार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा

विभागीय स्तरावर तोडगा न निघाल्यास समन्वय समितीच्या पातळीवर अंतिम निर्णय घ्यावा

तरीही वाद कायम राहिला तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय घेतला जाईल

दुसरीकडे भाजपच्या संसदीय समितीत फडणवीसांना स्थान मिळण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली असल्यानं या चर्चांना फडणवीसांच्या राजकीय विरोधकांकडूनही बळ दिलं जातंय. मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या बैठकीत समन्वयाचं आवाहन केलं असलं तरी ही खरच आवराआवर आहे का? आणि एकूणच फडणवीस दिल्लीच्या राजकारणात सक्रीय होणार का हे पाहणं औत्सुक्याचं असेल.....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com