Ajit Pawar News: वंदे भारत ट्रेनमध्ये अजितदादांचीच हवा; प्रवाशांसोबत निवांत गप्पा आणि सेल्फी, नाशिक दौऱ्याआधी प्रवासात काय घडलं?

Ajit Pawar Vande Bharat Train Nashik Travel: राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने त्यांचं भव्य शक्तिप्रदर्शन होणार आहे.
Ajit Pawar Vande Bharat Train Nashik Travel
Ajit Pawar Vande Bharat Train Nashik TravelSaam TV
Published On: 

Ajit Pawar Vande Bharat Train Nashik Travel: राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने त्यांचं भव्य शक्तिप्रदर्शन होणार आहे. याशिवाय शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी ते हजर राहणार असून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती असणार आहे.

दरम्यान, आज सकाळी अजित पवार (Ajit Pawar) वंदे भारत ट्रेनने नाशिकसाठी रवाना झाले. नेहमी प्रमाणे वृत्तपत्रे वाचत त्यांनी आपला प्रवास सुरू केला. मात्र, या प्रवासात सहप्रवासी असलेले एक ज्येष्ठ नागरिकाने आपल्या भावना व्यक्त करत जणू राज्यातल्या जनतेचीच भावना व्यक्त केली.

Ajit Pawar Vande Bharat Train Nashik Travel
Chhagan Bhujbal Threat Update: छगन भुजबळ धमकी प्रकरणात तरुणाला केलेली अटक बेकायदा, कोर्टाने दिला महत्वाचा आदेश

"दादा तुम्ही कामाचे लोक, आम्हाला बाकी कशाशी घेणे-देणे नाही", असं या ज्येष्ठ नागरिकाने म्हटलं. अजितदादा म्हणजे कामाचा माणूस, आम्ही जनरल पब्लिक तुमच्याबद्दल आदर...अशीच जनतेची कामे करा, बेस्ट लक दादा"... अशा भावना आज वंदे भारत ट्रेनमध्ये अनेकांच्या होत्या.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा जे शक्य आहे, लोक हिताचे आहे ते करत राहणार, काही सूचना असतील तर करा असे म्हणत प्रवाशांसोबत निवांत गप्पा मारल्या. यावेळी अनेक प्रवाशांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सेल्फी देखील काढले.

याशिवाय आपल्या समस्या देखील मांडल्या. दरम्यान, अजित पवारांनी आपल्या सोबत असणाऱ्या विशेष कार्य अधिकाऱ्यांना त्यांची नोंद घेण्यास सांगितले. प्रवासात इतर प्रवाशांना त्रास होऊ नये, कोणाला अडवू नका अशा सूचना आपल्या सुरक्षारक्षकांना केल्या.

Ajit Pawar Vande Bharat Train Nashik Travel
Maharashtra Political News: महाराष्ट्रात निवडून आलेल्या ४२२ आमदार, खासदारांवर गंभीर गुन्हे; अहवालातून धक्कादायक माहिती उघड

अजितदादांच्या या साध्या आणि सरळ स्वभावाने प्रवाशांची चांगलीच मने जिंकली. दरम्यान, नाशिक (Nashik) रेल्वेस्थानकावर अजित पवार यांचं आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. नाशिकमध्ये पोहोचल्यावर अजित पवार समर्थक भव्य बाईक रॅली काढणार आहे.

गेल्या आठवड्यात शरद पवारांनी येवल्यातील सभेला जाताना नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन केलं होतं. त्याला आजच्या शक्तिप्रदर्शनातून अजित पवार उत्तर देणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे कालच अजित पवार अर्थमंत्री झालेत. त्यामुळे त्यांच्या अजित पवारांच्या कार्यकर्त्यांत आणखी उत्साह आला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.