Crop Loan : शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांना देवेंद्र फडणवीसांची तंबी, पाहा Video

Devendra Fadnavis On Crop Loan : राज्य सरकारने मुंबईतील झालेल्या खरीप पूर्व हंगाम बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला. पीक कर्जासाठी सीबिल स्कोअर मागितला तर त्या बँकांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
Crop Loan : शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांना देवेंद्र फडणवीसांची तंबी, पाहा Video
Devendra Fadnavis On Crop LoanSaam Tv
Published On

शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँका जर सिबीलची मागणी करत असतील तर त्यांच्यावर एफआयआर दाखल केली जाईल, अशी तंबी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बँकांना दिलीय. ते खरीप पूर्व हंगाम बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होत होते. सिबीलची मागणी करत पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साम टीव्हीशी बोलतांना दिली.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्त्वाखाली दोन बैठका झाल्या. एक बैठक स्टेट लेव्हल बँकांची होती तर दुसरी बैठक ही खरीप हंगामासंदर्भात होती. या बैठकीत रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींना आणि स्टेट बँकेच्या कमिटीला सांगण्यात आलं की,शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबीलची मागणी करू नये. जर ज्या बँका सीबिलची अट ठेवून कर्ज नाकारत असतील त्यांच्यावर आम्ही त्यांच्यावर एफआयर टाकू. हीच माहिती तुम्ही बँकेला द्या, अशा सुचना आरबीआयच्या प्रतिनिधींना आणि राज्य पातळीवरील बँक कमिटींना देण्यात आल्याची माहिती फडणवीस म्हणालेत.

बँकांचे प्रतिनिधी बैठकीत सिबील मागणार नाही असं म्हणतात,परंतु बँक अधिकारी शेतकऱ्यांकडे सिबीलची मागणी करतात, ते चालणार नाही, असं म्हणत शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी सर्व दूर झाल्याची माहिती फडणवीसांनी दिलीय. खरीप हंगामसंदर्भात झालेल्या बैठकीत खते,आणि बियाणांची उपलब्धतेवर चर्चा झाली.तसेच यावेळी डीएपीएचा वापर कमी होऊन नॅनो युरियाच्या वापरावर भर दिला जाणार आहे.

जगभरात डीएपीएची कमतरता होतेय, त्यामुळे नॅनो युरियावर भर दिला जातोय, अशी माहिती फडणवीस म्हणालेत. तसेच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, त्याचा आढावा घेण्यात आलाय. खरीप हंगामात शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिलीय.

Crop Loan : शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांना देवेंद्र फडणवीसांची तंबी, पाहा Video
Cm Eknath Shinde: खते, बियाण्यांचे लिंकींग करणाऱ्या विक्रेते, कंपन्यावर कठोर कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे कृषी विभागाला निर्देश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com