Hingoli News
Hingoli NewsSaam Tv

Video : माझ्या बाबांना मारलं, त्यांना अटक करा; ओक्साबोक्शी रडत लेकीची मागणी, मन हेलावणारा व्हिडीओ व्हायरल

Hingoli News : मजुरी मागण्यासाठी गेलेल्या एका मजूराला मारहाण करण्यात आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर हिंगोलीत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान शेतमजूराच्या लेकीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Published on

Video : हिगोंली जिल्ह्यातील शिरड शहापूर येथे दोन दिवसांपूर्वी मजुराला तीन ते चार जणांकडून मारहाण करण्यात आली होती. मारहाणीमध्ये शेतमजूर जखमी झाला होता. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिरड शहापूर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मजूराच्या लेकीला अश्रू कोसळले.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतात हळदीच्या कामाची मजुरी मागण्यासाठी आनंदा मोरे हा शेतमजूर गेला होता. तेव्हा मजुरीचे पैसे न देता त्याला ३-४ जणांकडून मारहाण करण्यात आली. यामध्ये आनंदा मोरे हे जखमी झाले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर भारतीय आदिवासी पँथर संघटनेने शिरड शहापूर येथे रस्ता रोतो आंदोलन केले.

Hingoli News
Crime News : घरी कुणी नसताना आत शिरला, २२ वर्षीय तरुणीचा गळा चिरला; साखरपुडा मोडणं पडलं महागात

रस्ता रोको आंदोलन करताना आनंदा मोरेला मारहाण करणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. मारेकऱ्यांना अटक व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या वेळी मोरे यांचे कुटुंबीय हजर होते. तेव्हा मोरे यांच्या लेकीला रडू कोसळले. ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली.

Hingoli News
Crime : लग्नाच्या मंडपात खेळत होती ३ वर्षांची चिमुरडी, मिठाईचं आमिष दाखवत पळवलं, अत्याचार केल्यानंतर संपवलं

भारतीय आदिवासी पँथर संघटनेच्या शिरड शहापूर येथील रस्ता रोको आंदोलनानंतर औंढा पोलिसांनी तातडीने आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. रस्ता रोको आंदोलनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Hingoli News
Hagawane Family : फक्त सुनाच नाहीतर वडिलांनाही सोडलं नाही, राजेंद्र हगवणेने विकृतीची सीमाच गाठली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com