- अभिजीत देशमुख
गणपती, दसरा, दिवाळी या उत्सवांची शेतकरी, व्यापारी वर्षभर वाट पाहत असताे. या उत्सव काळात शेतक-यांना त्यांच्या फुलांना उत्तम दर मिळेल अशी खात्री असते. यंदा बहुतांश भागात फुलांची आवक माेठ्या प्रमाणात आहे. परंतु प्लास्टिकची फुले बाजारात विक्रीसाठी आल्याने नैसर्गिक फुलांचा विक्रीत घट हाेऊ लागल्याचे चित्र कल्याणसह राज्यभरात आहे. (Maharashtra News)
कल्याण येथील एपीएमसी मार्केट मधील फुल बाजारात गेल्या वर्षी दसऱ्याला फुलाचे भाव 80 ते 100 किलो होते. यावर्षी किलाेचा भाव हा 30 ते 40 रुपयांवर आला आहे. यंदा 500 हुन अधिक गाड्या आल्याने फुलांची आवक वाढली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान गेल्या दोन तीन वर्षांपासून प्लास्टिकच्या फुलांची विक्रीत वाढ झाल्याने शेतकरी, व्यपारी नाराज आहेत. जशी प्लास्टिक पिशव्यावर बंदी घालण्यात आली तशी सरकारने प्लास्टिकच्या फुलांवर बंदी घालावी जेणे करून शेतकरी, व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही अशी भाव शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ग्राहकांचा कल प्लास्टिक फुलांकडे असल्याने याचा फटका कल्याणच्या फुलांच्या बाजारावर स्पष्ट जाणवत आहे.
Edited BY : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.