Dhai Handi : गोविंदा रे गोपाळा! 'दहीहंडी'ला सार्वजनिक सुट्टी; मुख्यमंत्र्यांची घाेषणा

येत्या १९ ऑगस्टला माेठ्या जल्लोषात दहीहंडीचा उत्सव साजरा होणार हे निश्चित.
dhai handi, eknath shinde, maharashtra, public holiday
dhai handi, eknath shinde, maharashtra, public holidaysaam tv
Published On

सातारा : महाराष्ट्रात (Maharashtra) दहीहंडी (Dhai Handi) उत्सव माेठ्या उत्साहात साजरा केला जाताे. या उत्सवात अबालवृद्ध माेठ्या संख्येने सहभागी हाेत असतात. समाजात एकी निर्माण करणा-या हा उत्सव साजरा करण्यासाठी यंदा सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाणार आहे. याबाबतचे संकते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकतेच दिले आहेत. त्यामुळे यंदा नोकरदार वर्गास दहीहंडीची अधिकृत सुट्टी मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे. (Dhai Handi Public Holiday In Maharashtra)

दहीहंडीला (dhai handi 2022) सार्वजनिक सुट्टी जाहीर करून दहीहंडीला राष्ट्रीय सण म्हणून मान्यता मिळावी यासाठी आमदार प्रताप सरनाईक (mla pratap sarnaik) यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले हाेते. या निवेदनात सरनाईक यांनी दहीहंडी हा लोकप्रिय सण असून या दिवशी सार्वजनिक सुट्टी मिळाल्यास सर्वांना उत्सवाचा आनंद लुटता येईल अशी देखील मागणी करण्यात आली हाेती.

dhai handi, eknath shinde, maharashtra, public holiday
Pandharpur : तलवारीचा वार आईने झेलला हातावर, मुलाचा वाचला जीव पण...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात विशेषत: युवकांच्या आवडीचा सण असलेल्या दहीहंडी उत्सवासाठी सार्वजनिक सुटी जाहीर करु असे शुक्रवारी म्हटलं आहे. त्यामुळे काेराेनाच्या संकटानंतरचा यंदा पहिल्यांदाच येत्या १९ ऑगस्टला माेठ्या जल्लोषात दहीहंडीचा उत्सव साजरा होणार हे निश्चित.

Edited By : Siddharth Latkar

dhai handi, eknath shinde, maharashtra, public holiday
Satara Zilla Parishad : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठीची आरक्षण साेडत जाहीर
dhai handi, eknath shinde, maharashtra, public holiday
Toll Plaza : टाेल वाल्यांचं करायचं काय खालती डोकं वरती पाय...! आमदार विनाेद निकाेलेंचा महामार्गावर ठिय्या
dhai handi, eknath shinde, maharashtra, public holiday
International friendship day 2022 : मैत्री दिन का साजरा केला जातो ? जाणून घ्या त्याचा इतिहास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com