International friendship day 2022, International friendship day 2022 Date, International friendship day 2022 theme, International friendship day 2022 facts, friendship day history
International friendship day 2022, International friendship day 2022 Date, International friendship day 2022 theme, International friendship day 2022 facts, friendship day historyब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

International friendship day 2022 : मैत्री दिन का साजरा केला जातो ? जाणून घ्या त्याचा इतिहास

मैत्री दिन का साजरा केला जातो ?
Published on

मुंबई : मित्र आपल्या आयुष्यातील असं एक नातं जे मैत्रीच्या पलिकडच आहे. मैत्री म्हणजे जीवनातील महत्त्वाचा भाग.

हे देखील पहा -

ज्या क्षणी आयुष्यात आपल्याला एकट वाटू लागत त्या क्षणी आपल्या मागे हक्कांने उभे राहणारे आपले मित्र असतात. जीवनात जेव्हा काही चुकते तेव्हा मित्र आपला आत्मविश्वास वाढवू शकतो आणि नैराश्याच्या बंधनातून आपली सुटका करू शकतो. त्यामुळे, मैत्री ही व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाची असते. जागतिक मैत्री दिन का साजरा केला जातो हे जाणून घेऊया.

मैत्रीच्या माध्यमातून शांततेला प्रोत्साहन दिले जाते असा आंतरराष्ट्रीय नागरी संस्था वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेडने आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाचा प्रस्ताव मांडला होता.त्यासाठी फ्रेंडशिप डे दरवर्षी ३० जुलै रोजी साजरा केला जातो.

International friendship day 2022, International friendship day 2022 Date, International friendship day 2022 theme, International friendship day 2022 facts, friendship day history
Monsoon tips : पावसाळ्यात या वस्तू पाण्यात भिजल्यानंतर करा हे काम

हा दिवस पहिल्यांदा १९५८ साली साजरा (Celebrate) करण्यात आला होता. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २०११ मध्ये अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय मैत्री (Friendship) दिवस घोषित केला.

ऑगस्टमधील पहिला रविवार हा भारताशिवाय इतर अनेक राष्ट्रांमध्ये फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. यंदा फ्रेंडशिप डे ७ ऑगस्टला आहे.

वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेडच्या प्रस्तावापूर्वीच पहिल्या-वहिल्या फ्रेंडशिप डेची कल्पना आली. युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय मैत्री दिन जागतिक शांतता आणि सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी योगदान देऊ शकतो. गरिबी, हिंसाचार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन हे केवळ काही अडचणी, संकटे आणि जागतिक शांतता, सुरक्षा, विकास आणि सामाजिक सौहार्दाला धोका निर्माण करणारे घटक आहेत. मानवी एकतेच्या परिचित भावनेचा प्रचार आणि समर्थन करणे, जे अनेक मार्गांनी प्रकट होते परंतु सर्वात मूलभूत मैत्री आहे. म्हणून मैत्री आवश्यक आहे.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com