Buldhana News : गुरू-शिष्य नात्याला काळीमा, शिक्षकाला 5 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

या प्रकरणाचा खामगाव पोलिसांनी तपास केला हाेता.
Buldhana News, Court
Buldhana News, Courtsaam tv

Khamgoan Court News : बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या संग्रामपूर तालुक्यात एका सहा वर्षीय पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकास खामगाव येथील सत्र न्यायालयाने पाच वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. याबाबतची माहिती साम टीव्हीशी बाेलताना सरकारी वकील रजनी बावसकर यांनी दिली.(Maharashtra News)

Buldhana News, Court
Loksabha Election 2024 : खासदार होण्याची इच्छा... शाहू महाराज छत्रपतींनी स्पष्टच सांगितले

31 मार्च 2019 रोजी घडलेल्या या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी खामगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून खामगाव येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

Buldhana News, Court
Uddhav Thackeray Faction : शासकीय कर्मचा-यांवर ठाकरे गटाच्या शिवसैनिकाचा त्रागा, कार्यालयातच तिघांना लगावल्या कानशिलात

आज (शनिवार) खामगाव न्यायालयाचे न्यायाधीश यांनी आरोपी शिक्षक सुधाकर बुंदे यास (कलम 354 नुसार) दोन वर्षे सक्त मजुरी व (कलम 354 A) व पोक्सो कायद्यांतर्गत पाच वर्षे सक्त मजुरीचे शिक्षा सुनावली आहे अशी माहिती सरकारी वकील रजनी बावसकर यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com