- रणजीत माजगावकर
Kolhapur News : येत्या शुक्रवारी (ता. 25) कोल्हापुरात शरद पवार यांच्या जाहीर सभेस मी जाणार आहे हे यापुर्वीच जाहीर झाले आहे असे आज (शनिवार) शाहू महाराज छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांनी माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या फुटी नंतर पुन्हा पक्ष बांधणीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी संपूर्ण राज्याचा दौरा सुरू केलेला आहे. या दौऱ्यांमध्ये कोल्हापुरातील सभेचं अध्यक्षस्थान शाहू महाराज यांनी स्वीकारलेला आहे. त्याविषयी राजेंना छेडलं असता त्यांनी त्यांची भूमिका विषद केली. (Maharashtra News)
शरद पवार यांच्या सभेला जाणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार हे राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांची २५ ऑगस्टला कोल्हापुरात जाहीर सभा होत आहे. या सभेचे अध्यक्षस्थान श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे भुषविणार आहेत. पवार आणि छत्रपती घराण्याचे अतिशय चांगले संबंध आहेत.
राष्ट्रवादीच्या राजकीय सभेचे अध्यक्षपद स्वीकारत त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रयत्नाला बळ दिल्याचं बोललं जात आहे. त्यातच महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) येणाऱ्या लोकसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शाहू महाराज यांना संधी मिळणार का ? अशी चर्चा काेल्हापूरात (kolhapur lok sabha election) रंगली आहे.
बातम्या पाहिल्या नाहीत
याबाबत आज माध्यमांनी शाहू महाराज छत्रपती यांनी एका कार्यक्रमानंतर छेडले असता राजेंनी सभेला निमंत्रण आल्याने जाणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान खासदार हाेण्याबाबत अथवा काेणी उमेदवारी देणार याबाबत वृत्त येत असतील तर त्याबाबत मला काही माहिती नाही.
शाहू महाराज म्हणाले...
कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार असतील का ? या संदर्भात चर्चा सुरू आहे. याविषयी महाराज तुम्हाला राष्ट्रवादीतून खासदार व्हायला आवडेल का ? असा थेट सवाल साम टीव्हीच्या प्रस्तुत प्रतिनिधीने थेट विचारला. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी देखील 'पूर्वी मला खासदार व्हायचं होतं' पण आता नाही असे स्पष्ट सांगत या सर्व चर्चेंना पूर्णविराम दिलेला आहे. तसेच शाहू महाराज यांच्या या उत्तराने त्यांची राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा देखील थांबली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.