गणेशोत्सवात दाखवला छत्रपती शिवरायांचा खोटा इतिहास; थेट शाळेवर गुन्हा दाखल,नंदुरबारमधील धक्कादायक प्रकार

Fir On Nandurbar School : नंदुरबारच्या तळोदा शहरातील नेमसुशील विद्यामंदिरातील गणेशोत्सवाच्या देखाव्यावरून वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोप करत शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
Fir On Nandurbar School :
Nandurbar school case over Shivaji Maharaj history tableau during Ganeshotsavsaam tv
Published On: 
Summary
  • तळोदा शहरातील नेमसुशील विद्यामंदिरातील गणेशोत्सवाच्या देखाव्यावरून वाद

  • गणेश विसर्जन मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे कथित चुकीचे सादरीकरण केल्याचा आरोप

  • या प्रकरणी संबंधित शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

सागर निकवाडे, साम प्रतिनिधी

काही दिवासापूर्वीच धुमधडाक्यात गणेशोत्सव देशभरात साजरा करण्यात आला. चौकाचौकातील गणेश मंडळात गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. अनेक संस्था आणि शाळांमध्येही गणरायची स्थापना केली जाते. गणेश मंडळ गणरायाच्या मूर्तीजवळ देखावे करत असतात. परंतु या देखाव्यामुळे एका शाळेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेऊ. गणेश विसर्जन मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा चुकीचा देखाव्या साकरण्यात आल्याचा प्रकार घडलाय. हा धक्कादायक प्रकार घडलाय नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरातील नेमसुशील विद्यामंदिरात.

गणेश विसर्जन मिरवणुकीत नेमसुशील विद्यामंदिर शाळेने एका देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सादर करण्यात आला. या देखाव्यात मावळ्यांना एका थडग्यासमोर कव्वाली ऐकताना दाखवून शाळकरी मुलांना मुस्लिम वेषात उभे करण्यात आले होते. यामुळे धार्मिक भावना दुखावून हिंदु मुसलमान यांच्यात तेढ निर्माण केल्याचा आरोप करत गणेशभक्त आणि हिंदु जनजागृती समितीने तीव्र विरोध दर्शवला. समितीच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अखेर पोलिसांनी दखल घेत शाळेचे शिक्षक आणि संचालक यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Fir On Nandurbar School :
MPSC पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेट; ऋतुजा पाटीलला अटक, नंदुरबारमध्ये मुंबई पोलिसांची कारवाई

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या खोटा इतिहास पसरवणारे नेम सुशील विद्या मंदिर शाळेचे शिक्षक आणि संचालक यांना तात्काळ अटक करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना गणरायच्या मिरवणुकीवेळी कव्वाली गाताना दाखवण्यात आलं.

शाळेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाचा देखावा करण्यात होता. त्यावेळी विद्यार्थ्यांना मुस्लीमांची वेशभुषा करण्यात आली. विद्यार्थी एका थडग्याच्या बाजुला कव्वाली गात असल्याचं दाखवण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांनामध्ये हिंदु जनजागृती मार्फत तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर शाळा आणि शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Fir On Nandurbar School :
Nandurbar Crime: अल्पवयीन मुलांसह तरुणांवर लैंगिक अत्याचार, मोबाइलमध्ये २०० हून अधिक अश्लिल व्हिडीओ सापडले; नंदुरबार हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com