राष्ट्रवादीचा काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा प्रस्ताव, काँग्रेसमध्ये विलिनीकरणाला राष्ट्रवादीचा नकार

NCP Denies Congress Merger Claim: भाजपला आव्हान देण्यासाठी देशात अखंड काँग्रेसची चर्चा सुरु झालीय..मात्र याला महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ब्रेक लावलाय. नेमकं हे विलिनीकरणाचं प्रकरण काय आहे? काँग्रेस का आग्रही आहे? आणि राष्ट्रवादीला ते का मान्य नाही? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट.......
Sharad Pawar and Congress leaders amid rising speculation over a possible merger between NCP and Congress in Maharashtra politics.
Sharad Pawar and Congress leaders amid rising speculation over a possible merger between NCP and Congress in Maharashtra politics.saam tv
Published On

ठाकरेसेनेच्या संजय राऊतांनी अखंड काँग्रेसची चर्चा छेडल्यानंतर आता पवारांच्या राष्ट्रवादीची काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झालीय. याला कारण ठरलंय..काँग्रेस हायकमांडची महाराष्ट्रातील नेत्यांसोबत झालेली चर्चा...यातच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत चाचपणी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली...मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसला फार पूर्वीच विलिनीकरणाचा प्रस्ताव दिल्याचा नवा गौप्यस्फोट नाना पटोलेंनी केला आणि चर्चेला अधिकच जोर चढला..मात्र पवारांच्या राष्ट्रवादीनं हा दावा फेटाळून लावलालय.....

पवारांच्या राष्ट्रवादीनं जरी विलिनीकरणाची चर्चा नाकारली असली तरी सक्षमविरोधी पक्ष म्हणून काँग्रेसनं देशात काम करावं अशी इच्छा अनेकांची आहे...त्यामुळे काँग्रेसचे दिल्लीतील नेतेही पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत आग्रही आहेत...मात्र दुसरीकडे काँग्रेस बुडते जहाज आहे, त्यामुळे विलिनीकरणाचा फायदा भाजपला होईल, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय.

देशात भाजपविरोधी प्रादेशिक पक्षांची ताकद दिवसेंदिवस कमी होतेय... अशावेळी भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसनं मजबुत पर्याय उभा करणं गरजेचं आहे...त्यामुळेच अखंड काँग्रेसची चर्चा आता जोर धरू लागलीय...मात्र मविआतील अंतर्गत कलगीतुरा आणि सत्ताधाऱ्यांनी उडवलेली खिल्ली पाहता, हे 'विलीनीकरण' प्रत्यक्षात येणार की या चर्चा हवेत विरणार? याकडे देशाचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com