- चेतन व्यास
Wardha Congress News : राज्यात शेतक-यांचे (farmers) जीवन कठीण हाेत चालले आहे. मात्र दुसरीकडे वरिष्ठांना खुश करण्यासाठी दौरे करायचे, अयोध्येला जायचे हे योग्य नाही अशी टीका काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर (balu dhanorkar) यांनी मुख्यमंत्री (eknath shinde), उपमुख्यमंत्र्यांच्या (devendra fadnavis) अयाेध्या (ayodhya) दाै-यावर केली आहे. (Maharashtra News)
नागपुरात होत असलेल्या वज्रमूठ सभेच्या नियोजनाच्या अनुषंगाने वर्धेत आयोजित सभेला खासदार धानोरकर यांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकार परिषदेत बाेलताना धानोरकर म्हणाले महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. सुजाण आणि सुशिक्षित राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे हाल होताहेत. गारपीट होत आहे. अवकाळी पाउस, गारपिटीने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अयोध्येला गेले हा शोकांतिकेचा विषय आहे.
वास्तविक त्यांनी येथे राहायला पाहिजे होते अशी अपेक्षा धानाेरकरांनी व्यक्त केली. परंतु वरिष्ठांना खुश करण्यासाठी दौरे करायचे, अयोध्येला जायचे हे योग्य नाही असा टाेला खासदार धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयाेध्या दाै-याला लगावला.
यावेळी आमदार रणजित कांबळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी शिरीष गोडे उपस्थित होते.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.