- चेतन व्यास
Wardha News: दारूबंदी असलेल्या वर्धा (wardha) जिल्ह्यात अवैध दारूची तस्करी करण्यासाठी दारुविक्रेते समृद्धी महामार्गाचा वापर करत आहेत. अमरावती (amravati) जिल्ह्यातून दारुसाठा समृद्धी महामार्गावरुन वर्ध्यात आणत असतानाच वर्धेच्या स्थानिक गुन्हे शाखेने (lcb) कारवाई करत सुसाट असलेल्या दारू तस्करांवर कारवाई केली. (Maharashtra News)
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दारु तस्करी राेखण्यासाठी समृद्धी महामार्गांवर सापळा रचला हाेता. याची कुणकुण दारु विक्रेत्याला मिळताच त्याने पोलिसांच्या पथकाला जवळपास चार ते पाच तास मागे मागे फिरविले. अखेर दारु विक्रेत्याने थकून जात दारु भरलेली कार सोडून पळ काढला.
पोलिसांनी विटाळा जि. अमरावती येथे शेतातील कच्च्या रस्त्यावरुन कारसह ९ लाख २६ हजारांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. कार चालक सोनू उर्फ योगेश विश्वकर्मा रा. समतानगर, वर्धा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत अधिक माहिती अशी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्रगस्तीवर असताना अमरावती जिल्ह्यातून समृद्धी महामार्गावरुन दारुसाठा आणत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी केली. मात्र, आरोपीनी कार समृद्धी महामार्गवरून वरुनच नागपूरच्या दिशेने पलटविली. पोलिसांनी त्याच्या वाहनाचा पाठलाग सुरुच ठेवला.
अखेर त्याने कार सुसाट चालवित हळदगाव मार्गाने नेली. तेथून तो पवनार गावात आला आणि बायपास मार्गाने जुनापाणी चौकात आला पोलिस त्याच्या मागावरच होते. अखेर चालकाने थकून जात समृद्धी महामार्गाने विटाळा शिवारात एका शेतातील कच्च्या रस्त्यावर कार उभी करुन पळ काढला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारची पाहणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी मद्यसाठा आढळून आला. कारसह एकूण ९ लाख २६ हजारांचा दारुसाठा जप्त करीत आरोपीविरुद्ध सावंगी पोलिसात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.