Amravati Politics: याआधीही खासदार झालेत... इतका चिल्लरपणा कधी झाला नाही, आमदार यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार

Amravati Politics News: विकासकामाच्या भूमिपूजनाच्या श्रेयवादावरून अमरावती जिल्ह्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. तिवसा मतदारसंघात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी विकासकामांचे भूमिपूजन केल्यामुळे या मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या आहेत
Amravati Politics
Amravati PoliticsSaam Digital
Published On: 

Amravati Politics

विकासकामाच्या भूमिपूजनाच्या श्रेयवादावरून अमरावती जिल्ह्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. तिवसा मतदारसंघात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी विकासकामांचे भूमिपूजन केल्यामुळे या मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या आहेत. यावरून त्यांनी पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जबाबदार धरले असून हिवाळी अधिवेशनात हक्कभंग ठराव आणण्याचा इशारा दिला आहे.

तिवसा मतदारसंघात विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा स्वतः उपस्थित राहात आहेत. मात्र ही विकासकामं महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झाली होती आणि या सर्व कामांवर शिंदे, फडणवीस सरकारने स्टे आणला होता. मात्र अनेक प्रयत्न करून आम्ही न्यायालयातून स्टे उठवले. मात्र आता त्या विकासकामांच्या भूमिपूजनासाठी आम्हाला हेतू पुरस्कर डावललं जात आहे. आमचे नाव भूमिपूजनाच्या कार्यक्रमातून वगळले जात आहे. काही राजकीय लोक आम्ही मंजूर केलेल्या कामाचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधीही खासदार झाले आहेत मात्र दुसऱ्याच्या मतदारसंघात इतका चिल्लरपणा कधी झाला नव्हता, अशा शब्दात त्यांनी नवनीत राणांवर टीका केली आहे.

आम्ही विरोधी पक्षाचे आमदार असलो तरी आम्हाला काही अधिकार आहेत आणि आमचे हे अधिकार डावलण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ही कामे ज्या अभियंत्यांकडून केली जात आहेत, त्यांच्यावर हक्कभंग आणण्याचा इशारा, यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amravati Politics
Breaking Maharashtra Politics: मोठे उद्योग महाराष्ट्राबाहेर जाण्यास ठाकरे जबाबदार; शिंदे सरकारमधील मंत्र्यांचा गंभीर आरोप

''आमच्या नणंदबाईच्या गोळ्या संपल्या आहेत. त्यामुळे त्यांनी डॉक्टरकडे तपासणी करून घेतली पाहिजे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर हक्कभग दाखल करण्याआधी त्यांनी भूमिपूजनाचे जेवढे बोर्ड लावले आहेत त्याची चौकशी करावी. मला ज्याचे अधिकार आहेत त्याची अंमलबजावणी करणार आहे. जे अधिकार मला अमरावतीच्या लोकांनी दिले त्याच्यासाठी मी सक्षम आहे. कुठे भूमिपूजन करायचे आणि कोणाचे काम आहे हे त्यांनी सांगण्याची गरज नाही'' अशी, मिश्किल टीका खासदार नवनीत राणा यांनी यावेळी केली

या सर्व श्रेयवादाच्या लढाईत कामं कोणी आणली? कोणी पाठपुरावा केला? कोणी भूमिपूजन केलं? हे नागरिकांना चांगलंच समजत. मात्र, श्रेयवादाच्या लढाईत ग्रामीण भागाचा विकास कुठेही रखडू नये, शासन दरबारातून विकासाची विकासगंगा आमच्या गावापर्यंत यावी हीच माफक अपेक्षा सामान्य नागरिक करत आहेत.

Amravati Politics
Pandharpur News: 'कार्तिकी महापूजेला आल्यास उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळे फासू...' सकल मराठा समाजाचा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.