Pandharpur News: 'कार्तिकी महापूजेला आल्यास उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळे फासू...' सकल मराठा समाजाचा इशारा

Pandharpur News: पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात होणाऱ्या कार्तिकी महापूजेला मंत्र्यांना येऊ देणार नाही.. अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे.
devendra fadanvis ajit pawar
devendra fadanvis ajit pawarSaam TV
Published On

Pandharpur News:

राज्यात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. मराठा बांधवांकडून राजकीय कार्यक्रमांवर बहिष्कार घातला जात असून गावागावात पुढाऱ्यांना प्रवेश बंदी केली जात आहे. याच पाश्वभूमीवर पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात होणाऱ्या कार्तिकी महापूजेला मंत्र्यांना येऊ देणार नाही.. अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे. तसे पत्रही मराठा समाजाच्या वतीने मंदिर समितीला देण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, येत्या २३ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीची विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा होईल. ही महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येत असते. राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री असल्याने पुजेचा मान नेमका कोणाला? असा पेच उभा राहिला असतानाच मराठा समाजाने महापुजेला येणाऱ्या मंत्र्यांना विरोध दर्शवला आहे.

"महापूजेला येताना उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणचा अध्यादेश घेऊनच यावा, अन्यथा जे मंत्री, उपमुख्यमंत्री महापूजेला येथील त्यांच्या तोंडाला काळे फसू.." असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच ही कार्तिकी एकादशीची महापुजा वारकऱ्यांच्या हस्ते करावी.. अशी मागणीही मराठा बांधवांनी केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

devendra fadanvis ajit pawar
Maratha Aarakshan: आरक्षणाची मागणी करत 2 तास घोषणाबाजी केली, नंतर पाण्याच्या टाकीवरुन मारली उडी, भयंकर घटना

गावागावांत आंदोलने अन् नेत्यांना प्रवेश बंदी...

दरम्यान, आरक्षणाच्या निर्णयासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्याने मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाकडून राजकीय नेत्यांना गावागावात प्रवेश बंदी केली जात आहे. तसेच उद्यापासून प्रत्येक गावात आंदोलने सुरू करणार असल्याचा इशाराही जरांगे पाटलांनी दिला आहे. (Latest Marathi News)

devendra fadanvis ajit pawar
TMC Mahua Moitra: लॉगिनसाठी ओटीपीही लागतो... तो फक्त माझ्या फोनवरच येतो, हिरानंदानी यांच्या नाही: खासदार महुआ मोइत्रा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com