मनुस्मृतीविरोधी आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्याची प्रकृती बिघडली; तातडीनं रुग्णालयात दाखल

Congress Leader Hospitalised: नागपुरात मनुस्मृतीविरोधी आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांची प्रकृती बिघडली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोर्चा रोखल्यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली.
Congress Leader Hospitalised
Youth Congress Maharashtra president Shivraj More health updatesaam tv
Published On
Summary
  • नागपुरात मनुस्मृतीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसकडून ‘संविधान सन्मान यात्रा’ काढण्यात आली.

  • रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराकडे जाणारा मोर्चा पोलिसांनी जुना बगडगंज चौक परिसरात रोखला.

  • मोर्चा रोखल्यानंतर पोलीस आणि युवक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाल्याचे समोर आले.

नागपूरात मनुस्मृतीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शिवराज मोरे यांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मोरे यांना मोर्चावेळी अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेशीमबाग येथील आरएसएसच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरवर मोर्चा धडकणार होता.

Congress Leader Hospitalised
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान लँड न होता पुन्हा हवेत झेपावलं; लखनौ एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?

मात्र त्यापूर्वीच जुना बगडगंज चौक दरम्यान अडवण्यात आला.बॅरिकडेस लावून मोर्चा पोलिसांनी अडवल्यावर पोलीस आणि युवक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाली. त्याचदरम्यान नागपुरातील वातावरणही खूप दमट होते. त्याचवेळी शिवराज मोरे यांची प्रकृती बिघडली. दरम्यान मात्र पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीमुळे शिवराज मोरे यांची प्रकृती बिघडल्याचा आरोप युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय. शिवराज मोरे यांच्यावर पोलिसांनी हल्ला केल्याचा आरोप संघटनेने केला.

मोरे यांच्यावर हल्ल्याचा आरोप

मनुस्मृतीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने बुधवारी नागपुरात ‘संविधान सन्मान यात्रा’ काढली. या यात्रेदरम्यान पोलिसांनी शिवराज मोरे यांच्यावर हल्ला केला . त्यात त्यांच्या गळ्याला इजा करण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप आरोप युवक काँग्रेसकडून करण्यात आला. या घटनेत मोरे यांच्या गळ्याला दुखापत झाली आहे. जगनाडे चौकातील सेवन स्टार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अक्षय अरुण हेटे यांनी दिलीय.

Congress Leader Hospitalised
बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

या घटनेच्या निषेधार्थ तसेच संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल झालेत. पोलिसांनी केलेली कारवाई अत्यंत गंभीर असून, या घटनेचा निषेध करण्यासाठी पोलीस ठाण्याला घेराव घालण्यात आल्याचे हेटे यांनी सांगितले.

आरएसएस कार्यालयाच्या दिशेने मोर्चा

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने ‘संविधान सन्मान यात्रा’ काढण्यात आली. हा मोर्चा एनआयटी कर्मचारी सांस्कृतिक भवन, एस. डी. हॉस्पिटलसमोर, ग्रेट नाग रोड येथून सुरू झाला. तेथून मोर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती भवन परिसरातील कार्यालयाच्या दिशेने नेण्यात आला. यात्रेत युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सामाजिक समता, संविधानाचे संरक्षण आणि लोकशाही मूल्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com