
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. भिसेचा मृत्यू दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप केला जात आहे. राजकीय वर्तुळातूनही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असताना, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावरच हल्लाबोल केला आहे. मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी आहे, माणुसकीच्या नावावर कलंक असणारे कुटुंब आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
"मंगेशकर कुटुंबाने समाजासाठी नेमकं काय योगदान दिलं? कला क्षेत्रात त्यांनी मोठं नाव कमावलं, पण समाजासाठी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग किंवा दानशुरता फारशी दिसून आली नाही, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. तसेच "अशा प्रकरणांवर सरकारने लक्ष देऊन, गरिबांचे शोषण करणाऱ्या कोणत्याही घटकावर योग्य ती कारवाई केली पाहिजे", अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली.
मंगेशकर कुटुंबावर आरोपांची तोफ डागली
"मंगेशकर कुटुंब लुटारूची टोळी आहे. दान केल्याचं कधी कुणी पाहिलं का? केवळ गाणं चांगलं म्हटलं म्हणून त्यांचा उदो उदो केला. समाजासाठी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग किंवा दानशुरता फारशी दिसून आलेली नाही".
"ज्या खिलारे पाटलांनी दवाखान्यासाठी जमीन दिली त्यांना सोडलं नाही. माणुसकीच्या नावावर कलंक असणारे कुटुंब आहे. गरिबांचे शोषण करणाऱ्यांना साथ देऊ नये. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे", अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीवरून सरकारवर हल्लाबोल
एसटी कर्मचाऱ्यांना अर्धाच पगार देण्याच्या मुद्यावरही विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं. महाराष्ट्रामध्ये धावणाऱ्या ७० ते ८० टक्के एसटी बस नॉन एसी आहेत. त्या बसमध्ये बसू शकत नाही, पण चालक-वाहक चटके सहन करत आहेत. या गाड्या जुन्या झाल्याने अधिक तापतात. एसटी कर्मचाऱ्यांची वेतन कपात म्हणजे जखमांवर मीठ चोळणे आहे, जीवाशी का खेळता, असाही सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. वाहकाना पाणी मिळत नाही, सोयी नाही, सेवा करण्याचं काम ते करतात, सरकारची ऐपत नसताना योजना दिल्या कशाला, त्यांचा भावनाशी खेळू नये, अशीही टीका त्यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.