Maharashtra Politics: हर्षवर्धन पाटील पुन्हा पक्षांतर करणार? बावनकुळेंच्या भेटीनंतर रंगली चर्चा, असा आहे पक्षांतराचा इतिहास

Harshvardhan Patil Meet Bawankule: हर्षवर्धन पाटलांच्या शांत झोपेची चर्चा पुन्हा रंगलीय. त्याला नेमकं काय कारण ठरलंय आणि हर्षवर्धन पाटलांचा पक्षांतराचा इतिहास नेमका कसा आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Harshvardhan Patil
Harshvardhan Patil Meet Bawankulesaam tv
Published On

आठवतंय नं पाटलांचं हे गाजलेलं वक्तव्य. म्हणूनच की काय त्यावेळी राजकीय पटलावर ज्या काही नाट्यमय घडामोडी घडल्या त्यात काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटलांचं चौकशीपासून मुक्ती मिळाल्याने शांत झोप लागते, हे वक्तव्य आत्ता आठवण्याच कारण म्हणजे त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची घेतलेली भेट. हर्षवर्धन पाटील हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे या भेटीची चर्चा रंगल्यानंतर या चर्चा पाटलांनी फेटाळून लावल्यात.

हर्षवर्धन पाटलांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पवारांची तुतारी फुंकली. मात्र इंदापूरमधून दत्तात्रय भरणेंनी पाटलांचा पराभव केला. त्यानंतर हर्षवर्धन पाटील पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थ असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.त्यापार्श्वभुमीवर हर्षवर्धन पाटलांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतल्याने पुन्हा पक्षांतराच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र हर्षवर्धन पाटलांचा पक्षांतराचा इतिहास नेमका कसा आहे? पाहूयात.

Harshvardhan Patil
Mumbai News: मुंबई पुण्याचा कायापालट होणार; ४ लाख ७ हजार कोटींचा करार

हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतराचा इतिहास

1995

इंदापूरातून अपक्ष आमदार आणि युती सरकारमध्ये राज्यमंत्रिपद

1999

अपक्ष निवडणूक लढवून आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद

2004

पुन्हा अपक्ष निवडणूक लढवून आघाडी सरकारमध्ये सहकार मंत्रिपद

2009

हर्षवर्धन पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश आणि संसदीय कामकाज मंत्रिपद

2019

भाजपमध्ये प्रवेश, मात्र इंदापूरमधून पराभव

2024

भाजपची साथ सोडून पवारांची तुतारी फुंकली

Harshvardhan Patil
Cabinet Decision : मंत्रिमंडळाचे ९ महत्त्वाचे निर्णय, फडणवीस सरकारने कोणत्या जिल्ह्याला काय दिलं?

राजकारणात प्रवेश केल्यापासून नेहमी सत्तेच्या सावलीला असलेले हर्षवर्धन पाटील सत्तेबाहेर असल्याने अस्वस्थ असल्याचं म्हटलं जातंय.दुसरीकडे भाजपची साथ सोडल्यानंतरही भाजपने सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्षपद हर्षवर्धन पाटलांकडे कायम ठेवलं.त्यामुळे हर्षवर्धन पाटील शांत झोप लागण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश करणार की शिंदे गटात सहभागी होऊन पक्षांतराचं वर्तुळ पूर्ण करणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com