Sonia Gandhi News: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

सोनिया गांधी यांची तब्येत बिघडल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे मंगळवारी रात्री राजधानी दिल्लीत पोहोचेले होते.
सोनिया गांधी यांनी 24  जूनला बोलावली एआयसीसी'ची बैठक
सोनिया गांधी यांनी 24 जूनला बोलावली एआयसीसी'ची बैठकSaam Tv
Published On: 

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना रुग्णालयाता दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमध्ये त्यांना रुटीन चेकअपसाठी दाखल करण्यात आलं आहे. सोनिया गांधी यांची तब्येत मंगळवारी काहीशी बिघडली होती.

सोनिया गांधी यांची तब्येत बिघडल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे मंगळवारी रात्री राजधानी दिल्लीत पोहोचेले होते. त्यानंतर राहुल गांधी आज सकाळी ६ वाजता बागपत जिल्ह्यातून भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. मात्र, प्रियंका गांधी आई सोबत थांबल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

सोनिया गांधी यांनी 24  जूनला बोलावली एआयसीसी'ची बैठक
Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार; शिंदे गटातील कुणाला संधी मिळणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारपासून सोनिया गांधींची तब्येत बिघडली होती. त्यामुळेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात दाखल झालेल्या भारत जोडो यात्रेत सात किलोमीटर मागे मंगळवारी संध्याकाळी दिल्लीला परतले.

सोनिया गांधी यांनी 24  जूनला बोलावली एआयसीसी'ची बैठक
Maharashtra Politics : भाजपचं मिशन 45, मग शिंदे गटाचं काय?

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही कोविडशी संबंधित समस्यांमुळे गेल्या वर्षी जून महिन्यात दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.