Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार; शिंदे गटातील कुणाला संधी मिळणार?

२०२४ लोकसभा निवडणूकीपुर्वी मोदी मंत्रीमंडळातील लोकांची नाराजी असलेल्या आणि कामात दिरंगाई करणाऱ्या मंत्र्यांना मिळणार डच्चू
Modi Cabinet Reshuffle
Modi Cabinet ReshuffleSaam Tv

Modi Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान माेदी हे कामात दिरंगाई करणाऱ्या मंत्र्यांची खूर्ची काढून घेणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पाय उतार करणाऱ्या शिंदे गटातील नेत्यांना कॅबिनेट आणि राज्य मंत्री पद मिळेल अशी दाट शक्यता आहे.

Modi Cabinet Reshuffle
Thane News: माथाडी कामगार नेत्याच्या हत्येचा छडा; सापळा रचत पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

मोदी सरकारमध्ये मोठे फेरबदल होणार

येत्या १५ जानेवारीच्या अगोदर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळातील फेरबदलापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला आहे. त्यासाठी मंत्र्यांचे प्रगतीपुस्तक मागितले आहे.

वास्तविक, पक्षाचे राष्ट्रीय प्रमुख जेपी नड्डा यांचा कार्यकाळ २० जानेवारी रोजी संपत आहे. याशिवाय पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही जानेवारीत होणार असून मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील काही खासदारांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

कामात दिरंगाई करणाऱ्यांना डच्चू

२०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी मंत्रिमंडळातील लोकांची नाराजी असलेल्या आणि कामात दिरंगाई करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी होणार आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

नव्या मंत्र्यांना आपल्या कामाचे स्वरुप समजून घेण्यासाठी किमान पंधरा दिवसाचा कालावधी गरजेचं आहे. त्यासाठी नवीन मंत्र्यांना खात्याची माहिती तसेच अधिवेशनात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे समजून घेण्यासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी मिळणे गरजेचं आहे.

Modi Cabinet Reshuffle
Dhananjay Munde Car Accident : धनंजय मुंडेंच्या कारला अपघात

शिंदे गटातील २ मंत्र्यांना मिळणार संधी

मोदी सरकारच्या या फेरबदलात शिंदे गटालाही संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळणार असल्याचे समजते. शिंदे गटाच्या कोणत्या दोन जणांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

या मंत्र्यांना धक्का नाही...

मोदी सरकारमधील सध्याचे केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, मनसुख मांडवीय, निर्मला सितारमन, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, स्मृती इराणी वगळता अन्य मंत्र्यांवर टांगती तलवार असल्याचे बोलले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com