rahul gandhi
rahul gandhi saam tv

Rahul Gandhi : देशात फक्त चारच लोक खूश; राहुल गांधींचा रोख नेमका कोणाकडे?

राहुल गांधी यांनी मोदी सरकारचा देशातील विविध मुद्द्यांवरून खरपूस समाचार घेतला आहे
Published on

Rahul Gandhi News : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारचा देशातील विविध मुद्द्यांवरून खरपूस समाचार घेतला आहे. 'देशात फक्त चारच लोक खूश आहेत. हम दो, हमारे दो. यामधील दोन सरकारमध्ये आहेत. तर दोन बाजारामध्ये खूश आहेत. भाजप तुमचे लक्ष केवळ जात-धर्म यावर ठेवत आहे', अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. (Latest Marathi News)

rahul gandhi
जी 20 समुहाच्या लोगोवरून वाद, काँग्रेसचा आक्षेप; राजनाथ सिंह म्हणाले, "...तर हात कापायचे का?"

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात सुरू असलेली 'भारत जोडो यात्रा' हिंगोली (Hingoli) जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहे. याच भारत जोडो यात्रेतील कॉर्नर सभेत उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. राहुल गांधी पुढे म्हणाले, ' देशात रोजगार, नोकऱ्या पाहिजे आहेत. ही सरकारची जबाबदारी आहे. सार्वजनिक क्षेत्रात नोकऱ्या होत्या. तो मार्ग देखील खासगीकरणामुळे बंद केला आहे'.

'आता नवीन अग्निवीर योजना सुरू केलं. मी एका जवानाला विचारले, अग्निवीरबाबत सांगा. त्याने सांगितले की, 'सेनेमध्ये गेल्यावर आम्ही आमचा जीव देशाला द्यायला जातो. आर्मीमध्ये कमीत कमी आठ वर्षात जवान तयार होतो. पण सहा महिन्यात प्रशिक्षण देऊन आम्हाला तिकडे पाठवत आहेत. आमच्यावर अन्याय होतोय. पुढे काय परिणाम होतो, तुम्हाला माहीत आहे', असे राहुल गांधी पुढे म्हणाले.

rahul gandhi
Shraddha Case : दिल्लीत लव्ह जिहाद प्रकरणातून श्रद्धाचा बळी; अनिल बोंडेंचा आरोप

'पूर्वी जवान निवृत्त व्हायचा, तेव्हा गावात सन्मान असायचा. वीस वर्ष तो नोकरी करायचा. पण आता अग्निवीर योजनेमुळे नुकसान झालं. पूर्वीचा सन्मान गेला. सध्या लाखो तरुणांना हत्यार चालवायचे प्रशिक्षण देत आहेत. त्यानंतर चार वर्ष नोकरी झाली की, गावाकडे पाठवत आहेत. याचा परिणाम गंभीर होऊन गावात गुन्हेगारी वाढेल,असेही राहुल गांधी म्हणाले.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com