>> शिवाजी काळे
नवी दिल्ली : येत्या १ डिसेंबरला होणाऱ्या जी २० समुहाच्या शिखर परिषदेचं अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मोठी प्रतिमा निर्माण करण्याची भारतासाठी मोठी संधी मानली जात आहे. मात्र, या जी 20 शिखर परिषदेच्या अगोदर मोठा वाद उभा राहिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जी 20 समिटीच्या लोगोचं नुकतंच अनावरण केलं. या लोगोमध्ये भाजपचं निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचा समावेश करण्यात आल्यानं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आक्षेप घेतला आहे. (National News)
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची कॉंग्रेसवर टीका
काही लोक कमळाला भाजपचे निवडणूक चिन्ह म्हणूनच सांगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी G-20 चा लोगो जारी केला आहे. या लोकांचा कमळाच्या फुलावर आक्षेप आहे. काँग्रेस बहुधा भारताचा इतिहास विसरली आहे. 1950 मध्येच कमळाला भारताचे राष्ट्रीय फूल घोषित करण्यात आले. 1857 मध्ये स्वातंत्र्य सैनिक एका हातात भाकरी आणि दुसऱ्या हातात कमळ घेऊन स्वातंत्र्यासाठी लढले.
हात हे कोणत्याही राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह असेल तर ते कापले पाहिजे का? एखाद्या पक्षाचे चिन्ह जर सायकल असेल तर सायकल वापरायची नाही का? आम्ही भारताच्या सांस्कृतिक प्रतिष्ठेशी छेडछाड होऊ देणार नाही आणि खपवून घेणार नाही.
राजनाथ सिंहांचा कॉंग्रेसला इशारा
युरोपियन युनियनसह 20 देशाची ही संघटना आहे. यामध्ये 20 देशांच्या प्रमुखांची वार्षिक बैठक होते, जी G-20 चे हे समीट शिखर परिषद म्हणून ओळखले जाते. या परिषदेत मुख्य विषयांवर भर दिला जातो. दहशतवाद, आर्थिक समस्या, ग्लोबल वॉर्मिंग, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर या समिटमध्ये चर्चा केली जाते. या G20 देशाचा जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेत 80% वाटा आहे.
जी 20 सदस्य देश
जी20 समूहात अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनाडा, चीन, जर्मनी, फ्रांस, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सऊदी अरब, दक्षिण अफ्रीका, दक्षिण कोरिया, तुर्की, यूनाइटेड किंगडम, अमेरिका आणि यूरोपीय संघचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.