हळद फिटण्यापुर्वीच पत्नीने काढला पतीचा काटा; पती आवडत नसल्‍याचे कारण

हळद फिटण्यापुर्वीच पत्नीने काढला पतीचा काटा; पती आवडत नसल्‍याचे कारण
Beed Crime News
Beed Crime NewsSaam tv

बीड : ‘मला तो आवडत नाही’ असे म्हणत 21 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या पत्नीने अंगावरची हळद फिटण्यापूर्वीच पतीचा काटा काढला. ही धक्कादायक घटना 7 नोव्हेंबरला (Beed) बीडच्या निपाणी जवळका या गावात घडली. याप्रकरणी नवऱ्याचा खून (Crime News) करणाऱ्या पत्नीवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. (Live Marathi News)

Beed Crime News
Pandharpur: विठ्ठलाचे आजपासून 24 तास दर्शन बंद; कार्तिकी यात्रेची सांगता

निपाणी जवळका तांडा येथील पांडुरंग राजाभाऊ चव्हाण (वय 22) असे मयत नवविवाहित तरुण पतीचे नाव आहे. तर शितल चव्हाण असे आरोपी पत्नीचे नाव आहे. (Police) पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून पांडुरंग चव्हाण याचे व शीतल यांचे 14 ऑक्टोबर 2022 रोजी पौळाचीवाडी येथे रितीरिवाजाप्रमाणे लग्न (Marriage) झाले होते. त्यानंतर नवरदेव मुलगा मला आवडत नाही; असे म्हणून शीतल त्याच्यासोबत सतत भांडण करत असे.

पती गार पडल्‍याचे सांगितले सासू- सासऱ्यांना

दरम्‍यान 7 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री अकरा ते साडे अकराच्या दरम्यान हे नवदाम्पत्य बेडरुममध्ये झोपले. यानंतर रात्री साडेअकराच्या दरम्यान शीतल बेडरुमच्‍या बाहेर येऊन सासू- सासर्‍याला म्हणू लागली की, पांडुरंग हे गार पडले आहेत. त्यांना नातेवाईकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. या प्रकरणी सुनेनेच आमच्या मुलाला मारले; असा संशय शीतलच्या सासु-सासर्याने व्यक्त केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत सहा दिवसानंतर शीतल विरोधात मयत पांडुरंग यांची आई निलाबाई राजाभाऊ चव्हाण (वय 45) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच आरोपी शीतलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com