CM Eknath Shinde : मंचरचा मेळावा रद्द, शिवसेनेची पाळमुळं घट्ट करण्यासाठी मुख्यमंत्री उद्या काेल्हापुरात

मुख्यमंत्र्यांच्या दाै-या निमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील कार्यकर्ते जाेमाने कामाला लागले आहेत.
CM Eknath Shinde, Kolhapur, Ambegoan
CM Eknath Shinde, Kolhapur, Ambegoansaam tv
Published On

- राेहिदास गाडगे / रणजीत माजगावकर

Kolhapur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांचा उद्याचा उत्तर पुणे जिल्ह्यातील दौरा रद्द झाला आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मंचर येथे होणार हा मेळावा अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती संयाेजकांनी दिली. दरम्यान उद्या मुख्यमंत्री शिंदे हे काेल्हापूर दाै-यावर येणार असल्याची माहिती सेनेच्या संयाेजकांनी दिली. (Maharashtra News)

CM Eknath Shinde, Kolhapur, Ambegoan
Sambhaji Bhide News : संभाजी भिडेंच्या सभेला पाेलिसांनी नाकारली परवानगी, 'शिवप्रतिष्ठान' भूमिकेवर ठाम

माजी खासदार शिवाजी आढळराव- पाटील (adhalrao-patil) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा उद्या आंबेगाव (ambegaon) तालुक्यातील मंचर येथे मेळावा आयाेजित करण्यात आला हाेता. या मेळाव्यासाठी संयाेजकांनी जय्यत तयारी केली हाेती. दरम्यान अपरिहार्य कारणामुळे मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे अशी माहिती संयाेजकांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

CM Eknath Shinde, Kolhapur, Ambegoan
Tomato Prices : टाेमॅटाेच्या वाढत्या दरांना लागणार ब्रेक, किसान सभेचा 'या' निर्णयास विराेध (पाहा व्हिडिओ)

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या कोल्हापूर (kolhapur) शहरात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. क्षीरसागर म्हणाले कोल्हापुरातील पेटाळा मैदान येथे मुख्यमंत्र्यांची दुपारी चार वाजता सभा होणार आहे.

CM Eknath Shinde, Kolhapur, Ambegoan
Sindhudurg News : सिंधुदुर्ग एलसीबीची माेठी कामगिरी, ४५ गुन्हे दाखल असलेल्या गोव्यातील गुन्हेगाराला अटक; पैसे मोजण्याच्या मशीनसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

या सभेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत करणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या सूचना जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री (eknath shinde) उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत असेही क्षीरसागर यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com