Sambhaji Bhide News : संभाजी भिडेंच्या सभेला पाेलिसांनी नाकारली परवानगी, 'शिवप्रतिष्ठान' भूमिकेवर ठाम

संभाजी भिडे यांनी या पुढे वादग्रस्त वक्तव्य केल्यास त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा भीम टायगर सेनेने दिला आहे.
sambhaji bhide , nanded
sambhaji bhide , nandedsaam tv

- संजय सूर्यवंशी

Sambhaji Bhide News : श्री शिवप्रिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे हे नांदेड (sambhaji bhide in nanded) जिल्हा दौऱ्यावर आहेत. भिडे यांचा दाेन दिवसीय दाैरा वादग्रस्त ठरणार की काय अशी चिन्ह निर्माण झालीत. (Maharashtra News)

sambhaji bhide , nanded
Pawar Vs Pawar : अजितदादांनी चार वर्षात नऊशे कोटींचा निधी दिला, त्यांची साथ साेडणार नाही; शरद पवारांशी चर्चा न करता आमदार परतले

आज भिडे (shiv pratishthan hindustan sambhaji bhide) यांची हदगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु भिडे हे वादग्रस्त वक्तव्य करतात त्यामुळे त्यांच्या हदगाव येथील सभेला पोलिसांनी परवानगी देऊ नये अशी मागणी भीम टायगर सेनेच्या वतीने करण्यात आली होती. अन्यथा भीम टायगर सेना सभा उधळून लावणार असा इशारा देखील भीम टायगर सेनेचे अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी दिला होता.

sambhaji bhide , nanded
Success Story: खडकाळ जमिनीवर जांभळाची शेती बहरली; ॲमेझॉनवर मिळताेय किलाेला 200 रुपयांपासून 280 चा भाव

दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी (nanded) पाेलिसांनी संभाजी भिडे यांच्या हदगाव येथील सभेला परवानगी नाकारली. दरम्यान या सभेला परवानगी नाकारली असली तरी छोटेखानी सभा घेण्यावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते ठाम राहिले आहेत. त्यामुळे भिडे यांचा दाेन दिवसीय नांदेड जिल्ह्यातील दौरा वादग्रस्त ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान संभाजी भिडे यांनी या पुढे वादग्रस्त आणि जातीवादी वक्तव्य केल्यास त्यांची जागा त्यांना दाखवून देऊ असा इशारा भीम टायगर सेनेचे अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com