अभिजीत साेनावणे / सचिन बनसाेडे
Kisan Sabha On Tomato Prices : नाफेडमार्फत टोमॅटो खरेदी करण्याचा निर्णय (nafed will purchase tomatoes) केंद्र शासनाने घेतला आहे. किसान सभा या धोरणाचा निषेध करत असून केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचे डाॅ. अजित नवले (Dr. Ajit Nawale) यांनी नमूद केले (Maharashtra News)
डाॅ. नवले म्हणाले टोमॅटोचे दर पडले तेव्हा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने (central government) कुठलाही हस्तक्षेप केला नाही मात्र आता दर वाढल्यानंतर शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू लागल्याने ग्राहकांना कमी दरात टोमॅटो उपलब्ध करून देण्यासाठी नाफेडच्या माध्यमातून टाेमॅटाे खरेदी करणार आहे. केंद्र सरकार आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र येथून नाफेडच्या माध्यमातून टाेमॅटाे खरेदी करणार आहे. या निर्णयास किसान सभेचा ठाम विरोध असल्याचे डाॅ. नवलेंनी स्पष्ट केले.
डाॅ. म्हणाले मागील काळात टोमॅटोचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना अक्षरशः टोमॅटो फेकून द्यावे लागले. हे सर्वांनी पाहिले पण सरकारला पाझर फुटले नाही. आता कुठे भाव मिळत असताना केंद्राने घेतलेला हस्तक्षेप करण्याचा निर्णय चुकीचा आहे असेही डाॅ. नवलेंनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.