CM Eknath Shinde: सामान्य माणसाचे मन ओळखणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी...; CM शिंदेंकडून PM मोदींवर कौतुकाचा वर्षाव

CM Eknath Shinde Appreciation On PM Modi: त्यानंर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSaam TV
Published On: 

PM Modi Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुण्यात दाखल झाल्यावर मोदींनी सुरुवातीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अभिषेक केला. त्यानंर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Latest Marathi News)

"ब्रिटिशांविरोधात दोन हात करताना ज्यांच्या शब्दांना धार होती, अशा लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळत आहे. त्यानिमीत्ताने मी त्यांचे अभिनंदन करतो. इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, मनमोहन सिंग आणि शरद पवार यांचाही या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) म्हटलं आहे.

CM Eknath Shinde
Cm Eknath Shinde On Uddhav Thackeray: आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो, वर्क फ्रॉम होम नाही; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक महत्वाचा नेत म्हणून पाहिलं जातं. त्यामुळेच आज जगभरातील लोक त्यांच्याकडे महत्वाचा नेता म्हणून पाहत आहेत. बुलंद भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना लोकमान्यांच्या आशिर्वादाचे बळ प्राप्त होणार आहे, असं ही एकनाथ शिंदे म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी (PM Modi) देशाची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. त्यानंतर ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वासचा नारा देऊन सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी करत आहेत. त्यामुळेच त्यांच्या कार्याची पोचपावती सदर राष्ट्रीय सन्मानाने होत आहे,” असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि टिळक परिवारातील सदस्य उपस्थित होते.

CM Eknath Shinde
Puran Poli Tips: पुरणपोळ्या सारख्या फुटतात? मग या सोप्या टिप्स वापरा, एकही पोळी फुटणार नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com