Cm Eknath Shinde On Uddhav Thackeray: आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो, वर्क फ्रॉम होम नाही; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Monsoon Session: राज्यातील पाऊस आणि पूरपरिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी विधानसभेमध्ये दिला.
Cm Eknath Shinde On Uddhav Thackeray
Cm Eknath Shinde On Uddhav ThackeraySaam Tv

Eknath Shinde On Maharashtra Rain: राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) दुसऱ्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी राज्यातील पाऊस आणि पूरपरिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी विधानसभेमध्ये दिला. यावेळी नुकसानग्रस्त नागरिकांना सरकार करत असलेल्या मदतीची माहिती देत असताना मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.'आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो, वर्क फ्रॉम होम नाही.', असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)लगावला.

Cm Eknath Shinde On Uddhav Thackeray
Manipur Video Case: मणिपूर प्रकरणी केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, तपासाची सूत्रे CBI च्या हाती; आतापर्यंत १० अटकेत

मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितेल की, 'काही दिवसांपूर्वी कोणी तरी मुलाखत घेतली होती. ते डबल इंजिन का ट्रिपल इंजिन सरकार म्हणाले. डबल इंजिनचे काम बघून अजितदादा आले. आला ट्रिपल इंजिन झाले. आता या ट्रिपल इंजिनचे काम वेगाने सुरु आहे. देवेंद्रजींनी सुरु केलेली कामं त्यांनी अडीच वर्षांत बंद पाडली. ती आता आम्ही सुरु केली आहे. जनतेचे हित लक्षात घेऊनच कामं केली पाहिजे. आम्ही अहंकार मागे ठेवून कामं केली. आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो. वर्क फ्रॉम होम नाही.' असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

Cm Eknath Shinde On Uddhav Thackeray
Interim Bail To Vijay Darda: कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरण! विजय दर्डा यांच्यासह तिघांना जामीन मंजूर

'हे सरकार शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे सरकार आहे. राज्याचे सरकार चांगले काम करत आहे. तुम्ही कितीही टीका केली, आरोप केले तरी आम्ही कामाने उत्तरं देऊ. वाफेचे इंजिन नाही तोंडाची वाफ असते. त्यांना बोलू द्या, आम्ही कामं करत राहू. आमच्या कामाचा स्पीड वाढला आहे. त्यामुळे काही लोकांना पोटदुखी झाली आहे. आता पुढे काय होणार असे त्यांना वाटते.' , असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Cm Eknath Shinde On Uddhav Thackeray
BJP Rahul Kul Clean Cheat: भीमा साखर कारखाना घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; भाजप आमदार राहुल कुल यांना क्लिन चीट

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, 'सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी झाल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पावसाचा अलर्ट आहेत. पूरग्रस्त भागात आहेत त्यांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. या नागरिकांना मदतीचा हात दिला जात आहे. राज्यातील जनता आणि शेतकरी संकटात सापडतो तेव्हा सरकारने त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. सरकार सर्वसामान्यांचे आहे. त्यामुळे त्यांना कुठेही वाऱ्यावर सोडले जाणार नाही.'

तसंच, 'नुकसानग्रस्तांना मदत दिली जाते आहे. बोलून आम्ही थांबत नाही तर प्रत्यक्ष कृतीत काम करतो. फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी ऐवढ्यापूरते हे सरकार मर्यादीत राहत नाही. कारण हे सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे' असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. 'दिखाव्यासाठी आम्ही इर्शाळवाडीला गेलो नव्हतो. चिखल तुडवत आम्ही तिथे गेलो. इर्शाळवाडी दुर्घटनानंतर या गावातील गावकऱ्यांना सिडकोमार्फत घरं बांधून दिली जाणार आहे.', असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com