Puran Poli Tips: पुरणपोळ्या सारख्या फुटतात? मग या सोप्या टिप्स वापरा, एकही पोळी फुटणार नाही

Puran Poli Recipe: डाळ भिजवत असताना त्या भांड्यात एक चमचा तूप किंवा तेल टाकावे.
Puran Poli Tips
Puran Poli TipsSaam TV
Published On

Puran Poli : मराठी नववर्ष चैत्र महिन्यापासून सुरू होते. वर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. या सणानिमित्त सर्वांच्याच घरी पुरणपोळीचा बेत असतो. अशात अनेक महिलांना आजूनही पुरणपोळी हवी तशी बनवता येत नाही. त्यांची पुरणपोळी लाटताना अथवा शेकत असताना फाटून जाते. पुरणपोळी बनवताना चुकीची पद्धत वापरल्यास पोळ्या फुटतात. काही सोप्या टिप्स आहेत ज्या वापरल्याने पुरणपोळी कधीच फूटत नाही. त्यामुळे आज या बातमीमधून पुरणपोळी फुटू नये यासाठी काय केले पाहिजे ते जाणून घेऊ. (Perfect Puran Poli)

पुरणपोळीसाठी सोप्या टिप्स

  • सर्वात आधी जेव्हा पुरणपोळीसाठी कणीक मळून घ्याल त्यावेळी त्या पिठात एक चमचा साखर पाण्यात विरळवून घ्या. याने कणीक अगदी मऊ मळून होईल.

  • मळलेला कणकेचा गोळा हा तसाच ठेवू नये.

  • त्याला तेल (Oil) लावून बाजूला ठेवावा. तसेच नंतर पुरणपोळी बनवतना आधी कणीक तारा येईपर्यंत टेचून घ्या.

Puran Poli Tips
Gudi Padwa Food Recipe: गुढीपाडव्याला तयार करा अस्सल पारंपारिक पदार्थ आणि लुटा नव वर्षाचा आनंद
  • कणीक मळताना देखील २ चमाचा तेल टाकावे. त्याने पोळी नरम राहते.

  • पुरण तयार करताना आधी हरभऱ्याची डाळ किमान दोन तास भिजवून घ्या.

  • डाळ भिजवत असताना त्या भांड्यात एक चमचा तूप किंवा तेल टाकावे.

  • जेव्हा डाळीत गुळ टाकला जातो तेव्हा तो किसून टाकावा.

  • गुळ नेहमी सम प्रमाणात वापरावा, गुळ जास्त झाल्यास पोळी कडक होण्याची शक्यता असते.

  • सुंट, जायफळ यासह वेलदोडे देखील पुरणात टाकावेत. पोळी जड असल्याने या मसाल्यांनी शरीराला कोणताही त्रास होत नाही.

  • पाट्यावर पुरण वाटण्यापेक्षा मिक्सर किंवा पुरणयंत्राचा वापर करावा.

Puran Poli Tips
Unhealthy But Healthy Food : 'हे' 10 पदार्थ आरोग्यासाठी मानले जातात Unhealthy पण आहेत Healthy !
  • जर डाळीत गुळ जास्त झाला आणि मिश्रण पातळ झाले तर ते सुती कपड्याने गाळून घ्यावे.

  • तसचे पोळी लाटताना पुरण जास्त घट्ट वाटत असेल तर त्यावर थोडं दूध टाकावं.

  • या खूप सोप्या अशा टिप्स आहेत. या टिप्स वापरून नवीन स्वयंपाक शिकत असलेल्या मुलींना देखील पोळ्या बनवताना मदत होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com