CM Shinde Video: ठरल्याप्रमाणे चहापानावर बहिष्कार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना चिमटा

Chief Minister Eknath Shinde: पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी चहापानाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
CM Shinde Video: ठरल्याप्रमाणे चहापानावर बहिष्कार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना चिमटा
Chief Minister Eknath Shinde

विरोधकांनी ठरल्याप्रमाणे चहापानावर बहिष्कार घातला. चहापानाच्या कार्यक्रमाला आल्यानंतर चर्चा होते. परंतु विरोधकांना चर्चा करायचीच नाहीये. त्यांना चर्चेपासून पळ काढायचाय, असा चिमटा मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना घेतला. चहापानाच्या कार्यक्रमानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हे शेवटचं अधिवेशन होतं, यामुळे विरोधक या चहापानाच्या कार्यक्रमाला येतील आणि चर्चा करतील असं वाटलं होतं. परंतु विरोधकांना चर्चा करायची नाहीये. त्यांनी ठरल्याप्रमाणे चहापानावर बहिष्कार घातला. पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावलेत. विरोधक ज्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत, त्या सर्व प्रश्नांवर सरकार आपली बाजू मांडण्यास आणि उत्तरे देण्यास सक्षम असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधकांना चर्चा केलीच नाही, शिवाय प्रश्नांच्या परिपत्रकातही त्यांनी तेच तेच रटाळवाणी प्रश्न विचारली आहेत, एखाद्या अंतिम आठवडा बैठकीसारखी त्यांची प्रश्न आहेत, अशी कोपरखळी मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना मारलीय. बैठकीत आणि अधिवेशनात आमची उत्तरे देण्याची तयारी आहे, पण विरोधकांची समोर येऊन चर्चा करण्याची तयारी नाहीये. परंतु माध्यमांसमोर येऊन खोटं नेरिटिव्ह सेट करतात. 'खोटं बोल पण रेटून बोल' असा धंदा विरोधकांचा असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. सरकार विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास सक्षम असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याने पावसाळी अधिवेशन चांगेलच गाजेल, यात शंका नाही.

विरोधक चुकीची दिशा दाखवतात

विरोधक सरकारबद्दल चुकीचे विधान करत आहेत. चुकीचा समज पसरवत आहेत,जी वस्तू स्थिती नाही ते दाखवून, खोटं बोलून ते त्यांची पाठ थोपटून घेत आहेत. लोकसभेत महायुतीला पराभव झाला असल्याने सत्ताधारी पोकळ आश्वासनाचा पाऊस पाडतील, असं विरोधक म्हणत आहेत. परंतु आमचा पराभव झाला नाहीये. नरेंद्र मोदी यांच्या द्वेषाने पिछाडलेल्या विरोधक विरोधी बाकावर बसल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

CM Shinde Video: ठरल्याप्रमाणे चहापानावर बहिष्कार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना चिमटा
CM Eknath Shinde : मराठा, ओबीसी आरक्षणावर सरकारची भूमिका काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com