CM Eknath Shinde Video: शिवसेना कुणाची याचा निकाल या निवडणुकीत जनतेने दिला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

Shivsena Foundation Day: 'बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार त्यांना राहिला नाही. बाळासाहेबांचा फोटो लावून मत घेण्याचा अधिकार देखील त्यांना राहिला नाही.', अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर केली आहे.
CM Eknath Shinde Video: शिवसेना कुणाची याचा निकाल या निवडणुकीत जनतेने दिला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं
CM Eknath ShindeSaaam Tv

'शिवसेना कुणाची याचा निकाल या निवडणुकीत जनतेने दिला. दोन वर्षांपूर्वी जो आपण उठाव केला. खऱ्या अर्थाने या निवडणुकीत त्याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब करून दाखवला. आज आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता तो या निवडणुकीत पाहिले.', असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसंच, 'बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार त्यांना राहिला नाही. बाळासाहेबांचा फोटो लावून मत घेण्याचा अधिकार देखील त्यांना राहिला नाही.', अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर केली आहे. वरळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, 'कोणी म्हणाले ठाणे पडेल, कल्याण पडेल. पण ठाणे-कल्याण २ लाखांच्या मताधिक्याने आम्ही जिंकले. संभाजीनगर देखील जिंकले. कोकणात एकही जागा उबाठ्याला मिळू शकली नाही. आपण हा विजय घासून पूसन नाही तर ठासून मिळवला आहे. शिवसेनेचा परंपरागत मतदार आज आपल्यासोबत आहे. धनुष्यबाणासाोबत आहे. त्यांनी शिवसेनेवर विश्वास ठेवला आहे. शिवसैनिक आणि मतदारांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो.'

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, 'काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी, बाळासांहेबांचे विचार जपण्यासाठी आपण उठाव केला. दोन वर्षापूर्वी जे आपण उठाव केला तो खऱ्या अर्थाने आज या निवडणुकीत त्याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब करून दाखवला. आज आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता तो निवडणुकीत दिसला. मतदारांनी दाखवलेला विश्वास त्याला एकनाथ शिंदे तडा जाऊन देणार नाही. बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्यांना हिंदू बोलून घेण्याची लाज वाटते. आजही शिवसेनेच्या वर्धापन दिनामध्ये हिंदू माता भगिनींनो बोलण्याची त्यांनी हिंमत केली नाही. अरे कुठे गेले तुमचे हिंदुत्व. बाळासाहेबांचे नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार राहिला नाही. त्यांचा फोटो लावून मत घेण्याचा अधिकार देखील राहिला नाही.'

तसंच, 'धनुष्यबाण पेलण्याची ताकद मनगटात लागते ती आपल्या शिवसेनेत आहे. म्हणून शिवसेनेला लोकांनी मतदान केले. ऐवढी कसली लाचारी मतांसाठी. बासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली. त्यांचे विचार पायदळी तुडवले.', अशी टीका देखील एकनाथ शिंदे यांनी केली. 'आपण लोकसभच्या ७ जागा जिंकलो. आणखी ३ -४ जागा जिंकल्या असता याचा मला विश्वास होता. पण आपण का हरलो ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आता महायुती आपल्याला ताकदीने पुढे न्याययाची आहे.', असे देखील त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी पुढे सांगितले की, 'उबाठा म्हणजे उठा बसा संघटना आहे. काँग्रेस काठावर पास झाले. पण ऐवढा उन्माद की देशात एनडीएचे सरकार आले असे वागत होते. १२ जागांवर आलेली उबाठा जिंकल्याचा जल्लोष करत होती. उबाठा काँग्रेसच्या वोट बँकमुळे जिंकली हे लहान मुलं देखील सांगतील. काँग्रेसला गाडण्याची भाषा बाळासाहेब करायचे. बाळासाहेबांचा काँग्रेसने मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. त्या काँग्रेसला मतदान करताना उबाठाचा हात थरथरला कसा नाही.', असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसंच, 'ते कोणाच्या जीवावर जिंकले हे जनतेने पाहिले. रविंद्र वायकरांचा विजय त्यांच्या जिव्हारी लागला. एकनाथ शिंदे आयुष्यात खोटा बोलला नाही. जिंकलो तर जिंकलो. हारलो तर हारलो. म्हणे मोबाईलने हॅक केला. वायकरांचा विजय हा जनतेचा विजय आहे.'

त्याचसोबत 'कोकणात, ठाणे, कल्याण, पालघर, संभाजीनगरमध्ये उबाठा साफ झाले. उबाठाने आणि आम्ही १३ जागा समोरासमोर लढलो आणि ७ जागा जिंकल्या. सगळीकडे त्यांच्यापेक्षा सरस खरी शिवसेना ठरली. कोण जिंकले आणि कोण हारले हे स्पष्ट झाले आहे. खरी शिवसेना कुणाची आहे याचा निकाल या निवडणुकीत जनतेने दिला.' असे शिंदेंनी सांगितले. तसंच, 'एकनाथ शिंदे संपणार, शिवसेना संपणार असे काहीजण बरगळत होते. पण या राज्याच्या मतदारांनी त्यांचे दात घशात घातले. हा एकनाथ शिंदे संपणार नाही. हा एकनाथ शिंदे संपला नाही तर जिंकला.तुमच्या साथीने एकनाथ शिंदे जिंकला आणि यापुढेही जिंकत राहिल.', असे देखील एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com