Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वाधिक पेपरफुटी; पावसाळी अधिवेशनापूर्वी फडणवीसांचा गंभीर आरोप, VIDEO

Devendra Fadnavis on uddhav thackeray : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वाधिक पेपरफुटी झाल्या, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वाधिक पेपरफुटी; पावसाळी अधिवेशनापूर्वी फडणवीसांचा गंभीर आरोप, VIDEO

सूरज मसूरकर, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बुधवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत विरोधकांच्या पत्राला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेपरफुटीबाबत ठाकरेंवर गंभीर आरोप केला. 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वात जास्त पेपरफुटी झाल्या, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

विधिमंडळ अधिवेशनापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोफ डागली. 'पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सरकार सामोरे जात आहे. आज विरोधी पक्षाने प्रथेप्रमाणे चहापानावर बहिष्कार टाकत पत्र दिलंय. खोटे बोलून पण रेटून बोल. खोटे नरेटिव्ह तयार केले. आता खोटं बोलायच्या मानसिकतेत विरोधीपक्ष गेला आहे. विरोधकांनी आरशात चेहरा पाहावा असं हे पत्र आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वाधिक पेपरफुटी; पावसाळी अधिवेशनापूर्वी फडणवीसांचा गंभीर आरोप, VIDEO
Chandrasekhar Bawankule : राज्यात डबल इंजिनचं सरकार असणार; चंद्रशेखर बावनकुळेंना पडला राष्ट्रवादीचा विसर? पाहा Video

'महाविकास आघाडीने सांगितले की, विदर्भातील सिंचनाच्या प्रकल्पाला अपयश आले. आता कोण बोलतंय की, जे अडीच वर्ष सत्तेत होते. तेव्हा यांचा एकही प्रकल्प मार्गी लागला नाही. आपण ८७ प्रकल्प पूर्ण करत आलो आहोत. त्यांची एकही फाईल मुंगीच्या चालीएवढी पुढे हलली नाही. आम्हाला प्रश्न विचारत आहेत. त्यांनी स्वत:ला प्रश्न विचारले पाहिजे. त्यांच्या काळात विदर्भातही एकही प्रकल्पाला मंजुरी का मिळाली नाही? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

'ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वाधिक पेपरफुटीच्या घटना घडल्या. ते आम्हाला प्रश्न विचारत आहेत. आम्ही या सर्व बाबी अधिवेशनात मांडू. गुंतवणूकदारांनी महाराष्ट्राकडे पाठ फिरवली असं म्हणत आहेत. त्यांच्या काळात मागे गेलेलं राज्य आता आमच्या राज्यात पुढे आले आहे. ते विसरत आहेत, असे फडणवीस पुढे म्हणाले.

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वाधिक पेपरफुटी; पावसाळी अधिवेशनापूर्वी फडणवीसांचा गंभीर आरोप, VIDEO
CM Shinde Video: ठरल्याप्रमाणे चहापानावर बहिष्कार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना चिमटा

विरोधकांच्या पत्राला अजित पवारांकडून प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विधीमंडळाचं उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे. हे शेवटचं अधिवेशन असणार आहे. लोकांचे अधिक प्रश्न सोडवण्यात यावे, हे महायुतीचे प्रयत्न राहणार आहेत. चहापानाच्या कार्यक्रमाला सर्वांना बोलावलं. मात्र, नेहमीप्रमाणे विरोधक चहापानाला आले नाहीत'.

'आम्हाला एक पत्र दिलं आहे. त्यात मनुस्मृतीच्या श्लोकाने सुरुवात केली आहे. त्यांनी असं काही करण्याची गरज नव्हती. विरोधकांकडून एक नॅरेटिव्ह सेट करून जातीत तेढ निर्माण करण्याचं राजकारण विरोधक करत आहेत. आमचा मनुस्मृतीला विरोध आहे. मनुस्मृतीसारख्या मुद्याला या महाराष्ट्रात स्थान नाही, असे अजित पवार पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com