Chandrasekhar Bawankule : राज्यात डबल इंजिनचं सरकार असणार; चंद्रशेखर बावनकुळेंना पडला राष्ट्रवादीचा विसर? पाहा Video

Chandrasekhar Bawankule Government : राज्याचा विकास करण्यासाठी डबल इंजिनचं सरकार असेल असं विधान केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना राष्ट्रवादीचा विसर पडला की त्यांना वेगळा संकेत द्यायचा होता, असा कयास लावला जातोय.
Chandrasekhar Bawankule : राज्यात डबल इंजिनचं सरकार असणार; चंद्रशेखर बावनकुळेंना पडला राष्ट्रवादीचा विसर? पाहा Video
Chandrasekhar Bawankule
Published On

राज्यातील महायुतीमधील पक्ष वेगवेगळी वाट पकडणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. याच कारण ठरलंय, चंद्रशेखर बावनकुळे यांचे डबल इंजिनचं विधान. राष्ट्रावादी काँग्रेसच नेते अमोल मिटकरी यांच्या विधानानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाने आता राजकीय चर्चेंना उधाण आलंय.

अजित पवार यांनी महायुतीत बाहेर पडावं, असं विधान आमदार मिटकरी यांनी केलं होतं. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना राज्यात डबल इंजिनचं सरकार असावं, असं विधान केल्यानं अनेकांच्या भुवया उंचवाल्यात.

महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकारच असणार,राज्यात भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत, असं बावनकुळे म्हणालेत. यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचा विसर पडलाय का असा सवाल उपस्थित होत आहे.

काय म्हणाले बावनकुळे

महाराष्ट्राला विकसीत करण्याकरता आणि पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या स्वप्नाला पुढे नेण्याकरीता राज्यात डबल इंजिनचं सरकार असणार आहे. राज्यात भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असणार आहे. मोठ्या भावाकडून लहान भावाला कधीच आणि काही त्रास नाही. आमची मोठ्या भावाची भूमिका कायम आहे. कोणी काही बोलतय वारंवार त्यांना त्यांच्या त्यांच्या नेत्यांनी त्यांना समज द्यावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेत्यांना समजून सांगावं, तर अजित पवार यांनी त्यांच्या नेत्यांना समजून सांगण्याची गरज आहे. तर भाजप मोठा म्हणून कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com