तलावात पोहायला जाणं पडलं महागात; तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमध्ये हळहळ

Chhatrapati Sambhajinagar Tragedy : तीन अल्पवयीन मुलांना तलावात पोहायला जाणं महागात पडलं आहे. या घटनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
Chhatrapati Sambhajinagar news
Chhatrapati Sambhajinagar Tragedy Saam tv
Published On

देवळाई तांडा येथील तलावात दुर्दैवी घटना

तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

तिघांच्या मृत्यूने देवळाई तांडा परिसरात हळहळ

छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या देवळाई तांडा परिसरातील साई टेकडी येथील तलावात शनिवारी सायंकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलांपैकी तीन अल्पवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. तर दोन मुलांना सुदैवाने जीव वाचला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिघांच्या जाण्याने नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या देवळाई तांडामध्ये साई टेकडी तलावात पाच मुले पोहण्यासाठी गेली होती. पोहत असताना अचानक त्यांचा पाण्यातील तोल गेल्याने सर्व मुले अडचणीत सापडली. यापैकी दोन मुले जीव वाचवण्यात यशस्वी झाले. मात्र तीन मुले खोल पाण्यात बुडाली.

Chhatrapati Sambhajinagar news
मुलीच्या हळदीत वडिलाचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; लग्न घरावर कोसळला दुःखाचा डोंगर

घटनेची माहिती नगरसेवक मोहित त्रिवेदी यांनी अग्निशमन नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर तात्काळ पद्मपुरा मुख्य अग्निशमन केंद्र आणि कांचनवाडी अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावात शोधमोहीम राबवून बुडालेल्या तिन्ही मुलांना बाहेर काढले. त्यानंतर मुलांचे मृतदेह चिकलठाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Chhatrapati Sambhajinagar news
रत्नागिरीतील आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे दोघे विद्यार्थी बुडाले, एकाचा मृत्यू

मृत मुलांची नावे हाती आले आहेत. विशाल मच्छिंद्र घुले (वय १५ वर्षे), आदर्श गौतम इंगोले (वय १५ वर्षे), यश ज्ञानेश्वर बरंबाईल (वय १६ वर्षे) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. हे तिन्ही मुले सातारा परिसरातील लक्ष्मी कॉलनी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com