

रत्नागिरीतील आरे समुद्रकिनारी दोन विद्यार्थी बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली.
कोल्हापूरचा 17 वर्षीय अतुल सुतार याचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.
मयूर खाडे याला स्थानिकांच्या तत्परतेमुळे सुखरूप वाचवण्यात आले.
अमोल कलये, साम प्रतिनिधी
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध आरे समुद्रकिनारी मंगळवारी दुपारी घडलेल्या दोन विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली. हे दोघेही कोल्हापूरहून सहलीसाठी आले होते. बुडालेल्या दोघांपैकी एकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, तर त्याच्या मित्राला स्थानिकांच्या तत्परतेमुळे सुखरूप वाचवण्यात यश आले. समुद्रातून बडून मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थ्याचे नाव अतुल रघुनाथ सुतार (वय १७, रा. कोल्हापूर) असे आहे. तर मयूर विष्णू खाडे (वय १६, रा. कोल्हापूर) अशी वाचवण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. हे दोघे कोल्हापूर येथील एका खासगी क्लासमधील ४१ विद्यार्थ्यांचा गट शिक्षकांसह आरे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आला होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास विद्यार्थी समुद्रात पोहण्यासाठी उतरले. अतुल सुतार हा समुद्रात अधिक खोलवर गेला. त्याला परत आणण्यासाठी त्याचा मित्र मयूर खाडे त्याच्या मागे गेला. मात्र समुद्रातील पाण्याच्या तीव्र प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडू लागले.
दोघेही विद्यार्थी बुडत असल्याचे लक्षात येताच इतर विद्यार्थ्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रदीप पाटील तसेच झिप लाईनचे कर्मचारी सुरज चव्हाण, आदित्य पाटील, संस्कार साळवी, अजय मांजरेकर आणि महेश साळवी यांनी समुद्रात उड्या घेतल्या आणि बचावकार्य सुरू केले.
जीवाची पर्वा न करता केलेल्या प्रयत्नांमुळे दोन्ही विद्यार्थ्यांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. मात्र अतुल सुतार याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तर बेशुद्धावस्थेतील मयूर खाडे याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील आदेश कदम यांनी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, मृत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली असून ते रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत.
पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे शिवारात असलेल्या एका विहिरीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. विघ्नेश सज्जन शेजाळ (वय १३) आणि त्याचा मित्र अनंत महादेव नलवडे (वय १४, दोघेही रा. गुरसाळे) अशी मृतांची नावे आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.