संभाजीनगरमध्ये शाळेत चाकू हल्ला, 10वीच्या विद्यार्थ्यानं 4 वर्गमित्रांना भोसकलं

School Knife Attack: छत्रपती संभाजीनगरमधील देवगाव रंगारी येथील एका शाळेत दहावीच्या विद्यार्थ्याने किरकोळ वादातून चार वर्गमित्रांवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात चार विद्यार्थी जखमी झाले
School Knife Attack
School Knife Attack
Published On

एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यानं आपल्याच वर्गमित्रांवर चाकूनं वार केलेत. या हल्ल्यात 4 जण गंभीर जखमी झालेत. मात्र, विद्यार्थ्यानं आपल्याच वर्गमित्रांवर चाकूनं हल्ला का केला? ही घटना नेमकी कुठे घडलीये? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी गावातील एका नामांकित शाळेत काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडलीये. शाळेत विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद झाला आणि याच वादातून एका दहावीतील विद्यार्थ्यानं त्याच्याच 4 वर्गमित्रांवर चाकूनं जीवघेणा हल्ला केलाय. यातल्या एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, शाळेत चाकू हल्ला नेमका कशामुळे झालाय? ते पाहूयात...

शाळेत नक्की काय घडलं?

- संभाजीनगरातील रंगारी गावातील शाळेत विद्यार्थ्यांचा वाद

- धक्का का दिला यावरून 2 गटांत मधल्या सुट्टीत वाद

- संतापलेल्या विद्यार्थ्यानं थांबा तुम्हाला बघतोच असं म्हणत धमकावलं

- काही समजण्याच्या आतच पॉकेट चाकूनं 4 विद्यार्थ्यांवर सपासप वार

- 2 विद्यार्थ्यांच्या दंडावर, एकाच्या पायावर तर एकाच्या पाठीवर वार

- एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्यानं घाटी रुग्णालयात उपचार

School Knife Attack
E20 आता राहुल गांधींच्या टार्गेटवर, 'E20 मुळे स्कूटर, कार खराब होतात'

या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यानं सांगितलेला अनुभव अत्यंत भीतीदायक आहे. यामुळे मात्र शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. याच पार्श्वभूमीवर आता शाळा व्यवस्थापन सतर्क झालंय.

School Knife Attack
Today's Horoscope : शनिदेवाची कृपा राहणार, या राशिंवर पडणार पैशांचा पाऊस; वाचा शनिवारचे राशिभविष्य

मुळात शाळेत चाकू हल्ला झाल्याचं हे काही पहिलंच प्रकरण नाहीये. नांदेडमध्ये एकाच वर्गात शिकणाऱ्या दहावीच्या दोन विद्यार्थ्यांनी क्षुल्लक वादातून आपल्याच वर्गमित्रावर चाकूनं जीवघेणा हल्ला केला होता. त्यामुळे या शालेय विद्यार्थ्यांकडे धारदार शस्त्रं नेमकी येतात कुठून?...शाळा प्रशासनानं विद्यार्थ्यांची कसून तपासणी करण्याची गरज आहे. तर विद्यार्थी आपल्या शाळेच्या बॅगेत धारदार शस्त्र ठेवत असतील तर पालकांचीही त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे.

माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com