Chhatrapati Sambhajinagar: धक्कादायक! शिक्षकच पुरवतात कॉपी; 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रावर खासगी क्लासेसचे शिक्षकच पर्यवेक्षक

SSC- HSC Exam : छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श विद्यालयातील सामूहिक कॉपी प्रकरणात ज्या शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामधील १२ पैकी ११ शिक्षक खासगी क्लासेसचे शिक्षक असल्याचं सांगितलं जात आहे.
Chhatrapati Sambhajinagar News
SSC- HSC ExamSaamtv
Published On

यंदाच्या दहावी-बारावीच्या परीक्षेमधील गैरकारभार होऊन नये यासाठी सरकारने कॉपी मुक्त अभियान सुरू केलं. मात्र या अभियानाचा फज्जा बारावीच्या पहिल्याचं दिवशी उडाला. राज्यातील अनेक परीक्षा केंद्रावरील व्हिडिओ व्हायरल होत आहेत जेथे कॉफ्यांचा पूर आल्याचं दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही परीक्षा केंद्रात तर भयानक प्रकार समोर आलाय. परीक्षा केंद्रावर थेट खासगी क्लासेसचे शिक्षकच पर्यवेशक म्हणून फिरताना दिसत आहेत.

जिल्ह्यातील अनेक दहावी–बारावीच्या परीक्षा केंद्रावर खासगी कोचिंग क्लासेसचे शिक्षक हे पर्यवेक्षक म्हणून काम करत आहेत. तेच शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी कामदेखील करत आहेत. फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील आदर्श विद्यालयात सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षा केंद्रांवर आडगाव बुद्रुक येथील काशीराम विद्यालयाच्या नावावर छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी कोचिंग क्लासचे ९, तर खासगी इंग्रजी शाळांचे दोन शिक्षक पर्यवेक्षक म्हणून काम पाहत असल्याची बाब उघड झालीय.

आदर्श विद्यालयातील सामूहिक कॉपी प्रकरणात ज्या शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यामधील १२ पैकी ११ शिक्षक आमच्या शाळेचे नाहीत. केंद्र संचालकाने आमच्या शाळेच्या लेटरहेडचा गैरवापर करून आमच्या शाळेचे असल्याचे दाखविले. ही बाब गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्हाला समजली. याविषयी आम्ही तक्रार करणार आहोत असल्याचे काशीराम विद्यालयचे मुख्याध्यापक पंडित मगर यांनी सांगितल्याने परीक्षा केंद्राची पोलखोल झालीय.

Chhatrapati Sambhajinagar News
Nashik School News : शिक्षकाने उभारली अनोखी शाळा; 365 दिवसांत 12 तास चालणारी एकमेव शाळा कशी आहे?

परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून काम करणारे हे खाजगी कोचिंग क्लासेसचे शिक्षक पेपर सुरु झाला की, उत्तरे तयार करून ती कॉपी विद्यार्थ्यांना देतात. ही बाब बोर्डाला आणि प्रशासनाला माहिती नाही का? की प्रशासन डोळेझाक करतंय असा प्रश्न उपस्थित झालाय. पिंपळगाव वळण येथील आदर्श विद्यालयात बारावीच्या परीक्षा केंद्राला शनिवारी दुपारी १२:०० वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी अचानक भेट दिली असता येथे सामूहिक कॉपी आढळली.

Chhatrapati Sambhajinagar News
HSC Exam : कॉपी करू न दिल्याने शिक्षकाला अडवून धमकावले; शिक्षक संघटनेकडून पेपरवर बहिष्काराचा इशारा

गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून २८ जणांविरुद्ध फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर याप्रकरणाचा तपास पोलिस करताना पर्यवेक्षक म्हणून काम करण्यासाठी केलेला घोळ समोर आला आहे. खासगी किवा जिल्हा परिषद शाळेचा काडीमात्र सबंध नसताना छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी कोचिंग क्लासचे ९ शिक्षक, तर बाजारसांवगी येथील दोन इंग्रजी शाळेच्या दोन शिक्षकांनी आडगाव बु, येथील काशीराम विद्यालयाच्या लेटर हेडचा उपयोग करून पर्यवेक्षक म्हणून आपली वर्णी लावल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com