HSC Exam : कॉपी करू न दिल्याने शिक्षकाला अडवून धमकावले; शिक्षक संघटनेकडून पेपरवर बहिष्काराचा इशारा

Ahilyanagar News: राज्यात बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर शिक्षकांची नेमणूक झाली असून कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी बोर्डाकडून यंदा कडक पाऊल उचलण्यात आले आहे
HSC Exam News
HSC ExamSaam tv
Published On

सुशील थोरात 

अहिल्यानगर : बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. या परीक्षेदरम्यान कॉपी करू दिली नाही म्हणून शिक्षकाला चाकू दाखवून धमकावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा शिक्षक संघटनेने बुधवारी तहसील कार्यालयासमोर निषेध व्यक्त करून तहसीलदार उद्धव नाईक यांना निवेदन दिले. गुन्हेगारावर कडक कारवाई करा अन्यथा पेपरवर बहिष्कार टाकू असा इशारा शिक्षकांनी दिला आहे.

राज्यात बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर शिक्षकांची नेमणूक झाली असून कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी बोर्डाकडून यंदा कडक पाऊल उचलण्यात आले आहे. तरी देखील कॉपी पुरविण्यासाठी बरेचजण बाहेरून प्रयत्न करत असतात. दादागिरी करत कॉपी पुरविली जाते. दरम्यान कॉपी करू दिली नाही म्हणून शिक्षकाला धमकावण्याचा प्रकार अहिल्यानगर तालुक्यात घडला आहे. 

HSC Exam News
Chandrapur DCC Bank : चंद्रपूर जिल्हा बँकेतून सायबर गुन्हेगारांनी मारला डल्ला; ३ कोटी ७० लाख रुपये लांबवले

रस्त्यावर अडवून दमदाटी 

बारावीचा पहिला इंग्रजीचा पेपर मंगळवारी झाला असून या पेपराला अहिल्यानगर तालुक्यातील तिसगाव येथे गुंड प्रवृत्तीच्या तरुणाने शिक्षकांना चाकूचा धाक दाखवत धमकावत त्यांची गाडी अडवून दमदाटी केली. या घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटत असनू शिक्षक संघटना आक्रमक झाली आहे. त्यातील आरोपीला कठोर कारवाईची मागणी शिक्षकांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केले आहे. 

HSC Exam News
Wardha News : नोटाबंदीपासून वर्धा सहकारी बँकेत ७८ लाखांच्या नोटा तिजोरीतच; आरबीआयकडून निर्णय नसल्याने नोटांची किंमत शून्य

दरम्यान या घटनेचा निषेध करत निवेदन देतेवेळी माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष समाधान आराख, माध्यमिक शिक्षक बँकेचे संचालक सुरेश मिसाळ, प्राचार्य अशोक दौंड, आसिफ पठाण, बालम शेख, देविदास सोनटक्के, अजय भंडारी आदिसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांची शिक्षकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुटकळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षकांच्या मागणीला प्रतिसाद दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com